Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

सातारा शहराचा कायापालट करून दाखवणार – आमदर शिवेंद्रसिंहराजे

सातारा शहराचा कायापालट करून दाखवणार – आमदर शिवेंद्रसिंहराजे
Ashok Ithape
  • PublishedMarch 8, 2024

जुना आरटीओ चौक रस्ता, गणेश कॉलनी व अजिंक्य कॉलनी उद्यानाचे भूमिपूजन.

भुईंज: महेंद्रआबा जाधवराव

सत्ता असो वा नसो, सातारा शहरातील समस्या सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्राधान्य दिले आहे. नागरिकांना अपेक्षित विकासकामे मार्गी लावण्यासाठी सातत्याने भरीव निधी उपलब्ध केला आहे. जो काम करतो त्याच्याच पाठीशी सातारकर उभे राहणार आहेत. सातारकरांच्या साथीने आगामी काळात सातारा शहराचा कायापालट करून दाखवणार, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार शहरातील प्रमुख चार रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ५० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपये उपलब्ध झाले असून त्यापैकी ८ कोटी २५ लाख निधीतून जुना आरटीओ चौक ते भू- विकास बँक या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे तसेच आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून सदरबझार येथील गणेश कॉलनी येथे उद्यान (१ कोटी निधी) आणि अजिंक्य कॉलनी येथे उद्यान (८० लाख निधी) ही कामे मंजूर झाली आहेत.

या कामांचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी अशोक मोने, विजय देसाई, अविनाश कदम, प्रदीप मोरे, सुनील जाधव, अनिल जगदाळे, किरण बाबर, डॉक्टर राजेश शिंदे, राहुल फाळके, डॉक्टर जयंत सरवटे, योगेंद्र शेरकर, रमण वेलणकर, सुनील भंडारी, शैलेश जगताप, महेश देशमुख, निवास साबळे, प्रसाद साळुंखे, केतन दोशी, यशवंत पाटणे, अशोक साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जुना आरटीओ चौक ते भू- विकास बँक या रस्त्याची नेहमीच दयनीय अवस्था होत असते. त्यामुळे काँक्रीटीकरण हा कायमचा उपाय त्यावरत काढला आहे. ना. फडणवीस यांच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी निधी मिळाला आहे. काम झाल्यांनतर वाहनचालकांची कायमची गैरसोय दूर होणार आहे. शहरासह हद्दवाढीत समाविष्ट भागाच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वप्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून ती- ती कामे मार्गी लावली आहेत. काम कोण करतंय हे सातारकर चांगलेच ओळखून आहेत. त्यामुळे सातारकर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. सातत्यपूर्ण विकासकामे मार्गी लावून आगामी काळात साताऱ्याचा चेहरामोहरा बदलून दाखवू, असे ते म्हणाले.

याप्रसंगी दिलीप चव्हाण, सुभाष ओंबळे, मधुकर मोहिते, डी. जी. जाधव. साळुंखे सर, शकील सय्यद, शकील मुजावर, नितीन माने, संजय कदम, इंद्रजीत चव्हाण, संतोष फडतरे, संदीप माने, अन्सार आत्तार, दीपक शिंदे, सतीश मर्ढेकर, सतीश सूर्यवंशी, विकास शेंडे, श्रीकांत मोहिते, प्रीतम चव्हाण, प्रतीक मोहिते, आकाश जाधव, बाळासाहेब ठक्कर, चंद्रशेखर चोरगे, सुनील झंवर, अनिरुद्ध दोशी, हेमंत आपटे, किरण भोसले, स्वाती चव्हाण, स्मिता ओंबळे, सुरेखा मर्ढेकर, निखिल फडतरे, सुनील भांबळ, लालासो मोहिते, सुजित जगधने, निलेश साबळे, प्रभावती जोशी, राहुल मोहिते, रूपाली घोरपडे, रेखा गायकवाड, संभाजी धुमाळ, आबा शिंदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!