इंद्रजा डेव्हलपर्सचे सचिन सावंत सातारा उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित.
वाई : येथील इंद्रजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे संस्थापक सचिन जगन्नाथ सावंत यांना नुकतेच सातारा उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बांधकाम क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सातारा येथील स्विफ्ट न लिफ्ट मीडिया अँड टेक एलएलपी यांच्यावतीने हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मराठी सिने अभिनेता संतोष जुवेकर यांच्या हस्ते सचिन सावंत यांना प्रदान करण्यात आला.
इंद्रजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स च्या माध्यमातून गेले बारा वर्ष वाई शहर आणि परिसरात सचिन सावंत यांनी अनेक गृहप्रकल्पांची यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. बांधकाम क्षेत्रात एक विश्वसनीय नाव अशी वेगळी ओळख यानिमित्ताने सचिन सावंत यांनी निर्माण केली आहे. सध्या त्यांच्या फर्मच्यावतीने इंद्रजा आयकॉन या कमर्शियल आणि रेसिडेन्शिअल प्रकल्पाचे काम वाईच्या मध्यवस्तीमध्ये सुरू आहे. याशिवाय वाई शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या एकूण 450 सदनिकांच्या इंद्रजा विश्व या भव्य गृहप्रकल्पाच्या पहिल्या फेजचे (100 सदनिका) काम सुरू करण्यात आले आहे.
सातारा उद्योग गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन सावंत यांचे माजी आमदार मदन भोसले, रोहिदास पिसाळ, अनिल सावंत, दीपक ननावरे, डॉ. सतीश बाबर, रोहन भोसले, चेतन भोसले, वाई चहा कट्टा ग्रुप आदींनी अभिनंदन केले आहे.













