Mon, Mar 2, 2026
महाराष्ट्र

मांजरी ग्रीन वुड्समध्ये रंगला अनोखा हळदी – कुंकू‎ सोहळा.

मांजरी ग्रीन वुड्समध्ये रंगला अनोखा हळदी – कुंकू‎ सोहळा.
Ashok Ithape
  • PublishedMarch 2, 2024

सामाजिक एकता दर्शवत महिलांनी जपला संस्कृतीचा वारसा

पुणे / प्रतिनिधी :

येथील मांजरी ग्रीन वूडसमधील महिलांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा देखावा सादर करीत व सामाजिक एकता दर्शवत संस्कृतीचा वारसा जपत अनोख्या पद्धतीने सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ संपन्न केला.

सर्व महिलांनी एकजुटीने यशस्वी केलेल्या या सांस्कृतिक सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर येथील मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर वेगळी सांस्कृतिक संकल्पना घेऊन मांजरी ग्रीन वुड्स मधील महिलांनी हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने श्रीराम जन्मापासून ते वनवासापर्यंत व त्यानंतर श्रीराम अयोध्येत परत आले त्यापर्यंतचा त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा प्रवास आणि त्याचे चित्र प्रदर्शन दाखवण्याचा स्तुत्य प्रयत्न केला.

मांजरी ग्रीनवुड्स येथील महिलांनी हळदी कुंकवाचा हा उपक्रम अनोख्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रभू श्रीराम सर्वांसाठी खरोखरच आदर्श आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सखा कृष्ण आवश्यक आहे. तसाच प्रत्येकाच्या मनात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असणंही आवश्यक आहे. या सोहळ्यातून श्रीराम व सीता यांचा जीवन प्रवास समाजातील महिलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत सामाजिक संदेश‎ दिला.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना भापकर, प्रमिला डोके, हर्षदा वाडेकर, शीतल टेकवडे, नीलम खळदकर, स्नेहा महाडिक, प्रियंका नेवसे, श्रुती विचारे, मोनाली भोंडवे आदी महिलांनी विशेष योगदान दिले. परस्परातील स्नेह आणि गोडवा कायम टिकवा तसेच आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी आयोजित हळदी-कुंकू समारंभात महिलांनी पारंपारिक वेशभूषा प्रदान करून एकजूट दाखवली.
या. कार्यक्रमात आलेल्या सर्व महिलांना हळदी- कुंकू देऊन वाणवसाही देण्यात आला.

मैत्रीचा गोडवा तिळगुळासारखा टिकून राहावा तसेच विचारांचे आदान- प्रदान व्हावे आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनातन महीलांना आनंददायी जीवन जगावे, अशी यामागे भावना असल्याचे महिलांनी सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!