राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्काराने गणपत जाधव सन्मानित
भुईंज: महेंद्रआबा जाधवराव
बावधन ता वाई येथील ग्रामीण साहित्यिक डॉ जनार्दन भोसले यांच्या मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले गावगाडा साहित्य पुरस्कार माळशिरस जि सोलापूर येथील लेखक ग्रामीण कथाकार श्री गणपत जाधव यांना सन्मानित करण्यात आले आहे.
नवं साहित्यिकांना लेखन प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुरस्कार सुरू केल्याचे डॉ. जनार्दन भोसले यांनी सांगितले आहे.
विश्वकर्मा तरुण मंडळ वडशिवणे ता करमाळा जि सोलापूर यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
शिवाजीनगर, पुणे येथील मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे लता मंगेशकर सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ राजेंद्र झुंजारराव होते या वेळी कवयित्री कल्पना दुधाळ आणि जेष्ठ लेखिका डॉ किर्ती मुळीक यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
तसेच व्याजवाडी ता वाई येथील दत्तात्रय पिसाळ यांच्या वतीने मातोश्री रत्नमाला पिसाळ गावगाडा पुरस्काराने श्री नागु वीरकर, मानसी चिटणीस यांना सन्मानित करण्यात आले.
गावगाडा साहित्य पुरस्कार समनव्य समिती चे अध्यक्ष सोमनाथ टकले, डॉ जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ, बाबुराव इंगळे कवी सुहास घुमरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन आयोजन केले. यावेळी कवीचे काव्य संमेलन पार पडले.
रविंद्र रायकर, गायत्री क्षीरसागर, ऋषिकेश भरती, प्रा वैजयंती जाधव संजय राऊत, महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले पुरस्कार प्राप्त लेखक,कवी ,वाचक, विद्यार्थी मॉडर्न कॉलेज मधील प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी व कवी सुहास घुमरे यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष सोमनाथ टकले यांनी केले, आभार डॉ जनार्दन भोसले यांनी मानले.













