Thu, Jan 15, 2026
नोकरी मार्गदर्शन

महारोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित

महारोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित
Ashok Ithape
  • PublishedFebruary 29, 2024
पुणे, दि.२८: पुणे विभागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय येथे  २ व ३ मार्च २०२४ रोजी  आयोजित विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्यासाठी  ९२७०११९६३४ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शैक्षणिक पात्रता धारण करीत असलेल्या नोकरी इच्छुक तरूणांना रोजगार व ॲप्रेंटिसच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  नोकरी इच्छुक तरूणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याकरिता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/#/registerया लिंकवर नावनोंदणी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी वर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!