Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

सातारा पालिकेसाठी १३ कोटी तर, मेढा नगरपंचायतीसाठी ३ कोटी ७० लाख – आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे;

सातारा पालिकेसाठी १३ कोटी तर, मेढा नगरपंचायतीसाठी ३ कोटी ७० लाख – आ.श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे;
Ashok Ithape
  • PublishedFebruary 27, 2024

सातारा शहरातील ४४ आणि मेढा शहरातील ५ विकासकामे लागणार मार्गी

भुईंज: पत्रकार महेंद्रआबा जाधवराव

आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून राज्याच्या नगर विकास विभागामार्फत सातारा नगर पालिकेसाठी १३ कोटी ते मेढा नगरपंचायतीची ३ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या या निधीतून सातारा शहरातील ४४ तर, मेढा शहरातील ५ विकासकामे मार्गी लागणार आहेत. निधी मंजूर केल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि ना. अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार सातारा शहरातील कब्रस्थान येथे संरक्षक भिंत बांधणे यासाठी २५ लाख, मंगळवार पेठेतील खारी विहीर येथे दोन मजली समाजमंदिर बांधणे ८० लाख, यादोगोपाळ पेठ ३९३ येथे सभामंडप बांधणे १५ लाख, सरस्वती कॉलनी येथे बंदिस्त गटर १५ लाख, जिल्हा परिषद कॉलनी येथे आरसीसी बंदिस्त गटर १४ लाख, शाहूपुरी गणराया हौसिंग सोसायटी येथे वाचनालय बांधणे ५० लाख, रांगोळे कॉलनी येथे पोहण्याचा तलाव बांधणे १ कोटी २५ लाख, गणराया कॉलनी येथे बंदिस्त गटर व लक्ष्मीनगर येथे रस्ता डांबरीकरण करणे १० लाख, गोळीबार मैदान येथील नंदादीप सारंग येथे रस्ते व गटर करणे ३० लाख, सह्याद्री पार्क गडकर आळी येथे रस्ता व गटर ४० लाख, देशमुख कॉलनी व मुथा कॉलनी अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण १ कोटी ७५ लाख, बापूजी साळुंखे नगर व गणेश नगर रस्ते व गटर करणे २० लाख, अजीज कलाल घर ते शंकर कवाडे घर ओढ्यास संरक्षक भिंत २० लाख, कोयना सहजीवन सोसायटी येथे रस्ते व गटर २५ लाख, केसरकर पेठ श्री घोरपडे घर ते इन्फिनिटी अपार्टमेंट अखेर रस्ता करणे १० लाख, डीसीसी बँक ते प्रवीण जाधव घर रस्ते व गटर करणेसाठी २० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

कृष्णकुंज अपार्टमेन्ट येथे मोकळी जागा विकसित करणे २५ लाख, सोमवार पेठ १३८ येथील सभागृहाचे उर्वरित काम करणे २५ लाख, फॉरेस्ट कॉलनी गिरिचिंतन तलाठी कॉलनी येथे मोकळ्या जागेत काँक्रीटीकरण ४५ लाख, कुंभारवाडा केसरकर पेठ येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे २५ लाख, सह्याद्री पार्क लक्ष्मीनगर येथे आरसीसी बंदिस्त गटर १७ लाख, शाहूपुरी, अवधूत चिंतन खटावकर कॉलनी येथे सभामंड्प २० लाख, भास्कर मेहेंदळे घर आजाद कॉलनी ते करंजे पार अखेर रस्ता खडीकरण, डांबरीकरण २० लाख, करंजे कमान ते भैरवनाथ मंदिर ते करंजे पार अखेर रस्ता खडीकरण, डांबरीकरण २५ लाख, सर्वोदय कॉलनी शाहूपुरी रस्ता व गटर ३५ लाख, करंजे पेठ श्री मंगलमूर्ती गणेश सेवा मंडळ समाजमंदिर बांधणे २० लाख, खेड येथील जयमल्हार कॉलनी अंतर्गत रस्ते १० लाख, खेड गुलमोहर कॉलनी वॉर्ड २ मध्ये अंतर्गत रस्ते १० लाख, पिरवाडी वॉर्ड ३ मध्ये मिस्त्री कॉलनी येथे रस्ते १० लाख, प्रभाग १८ अ कामाठीपुरा येथे बंदिस्त गटर १० लाख, प्रभाग १८ मधील नवीन हद्दवाढ झालेल्या सोसायटीत बंदिस्त गटर १० लाख, प्रभाग १९ पॉवर हाऊस पाण्याची टाकी ते संजय किसन चौगुले घर मंगळवार पेठ येथे खडीकरण डांबरीकरण करणे ३० लाख, धस कॉलनी अंतर्गत खडीकरण डांबरीकरण १५ लाख, संत कबीर सोसायटी ४४६ मंगळवार पेठ अंतर्गत काँक्रीट रॉड व पायऱ्या, गटर करणे १० लाख, पै चौक ते देवी चौक रस्ता डांबरीकरण व गटर १ कोटी १० लाख, शनिवार पेठ सप्तशृंगी मंदिर ते १००६ फ ओढा येथे काँक्रीटीकरण २५ लाख, कूपर कॉलनी नाना नानी पार्क कम्पाउंड, गेट व इतर सुविधा २० लाख, शाहूपुरी मेन रस्ता ते प्रतीक डुप्लेक्स रस्ता काँक्रीटीकरण २० लाख, भू विकास बँक मागे अमृत कॉलनी येथे ५०० मीटर रस्ता दंबरीकरण ५०० मीटर पाण्याची पाईप टाकणे ३४ लाख, करंजे पेठ स्वागत कमान शेजारी नगर पालिकेची जागा विकसित करणे २० लाख, सूर्यवंशी कॉलनी ते सागर कन्या कमान शिवशंभो महादेव मंदिर डांबरीकरण १० लाख, निसर्ग कॉलनी पुलाशेजारी संरक्षक भिंत १० लाख आणि ६६५/६६४ मंगळवार पेठे येथे बास्केट बॉल कोर्टला विद्युतीकरण/ विकसित करणे यासाठी १५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

मेढा नगर पंचायत हद्दीत बीएसएनएल कार्यालयालगत नगरपंचायत मालकीच्या जागेत बागबगीचा उद्यान विकसित करणेसाठी २ कोटी, पठाण ओढा ते ग्रामीण रुग्णालय साकव पुलापर्यंत रस्ता रुंदीकरण खडीकरण डांबरीकरण करणे २० लाख, शशिकांत गुरव घराच्या पाठीमागे गोरे यांच्या शेताकडे नदीकडील बाजूस बंदिस्त गटर संरक्षक भिंत ३० लाख, गांधीनगर अंतर्गत गटर व रस्ते ३० लाख आणि वेण्णा हायस्कुल लगत संरक्षक भिंत बांधणे यासाठी ९० लाख रुपये निधी मंजूर झालं आले. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे त्वरित सुरु करा आणि कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!