Tue, Mar 3, 2026
सामाजिक

रोटरी की पाठशाला प्रोजेक्ट दृष्टी अंतर्गत २५शाळांना ग्रंथालय कपाट आणि पुस्तकांची भेट.

रोटरी की पाठशाला प्रोजेक्ट दृष्टी अंतर्गत २५शाळांना ग्रंथालय कपाट आणि पुस्तकांची भेट.
Ashok Ithape
  • PublishedFebruary 27, 2024

वाई l प्रतिनिधी :२३ फेब्रुवारी २०२४ रोजी रोटरी स्थापना दिनानिमित्त, रोटरी क्लब ऑफ वाई यांनी ,डिस्ट्रिक्ट ३१३२च्या पहिल्या CSR प्रोजेक्ट मधून वाई तालुक्यातील २५जिल्हा प्राथमिक शाळा यांना २५ग्रंथालय कपाट आणि पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी कालिका स्टील आणि  डिस्ट्रिक्ट ३१३२ चे सहकार्य लाभले.

या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी रो.प्रमोद शिंदे आणि डिस्ट्रिक्ट कम्युनिकेशन सेक्रेटरी सोनाली शिंदे हे उपस्थित होते.

रोटरीच्या स्थापनेबाबत आणि रोटरी क्लब ची माहिती क्लबच्या अध्यक्ष रो.डॉ.प्रेरणा ढोबळे यांनी करून दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक लिटरसी डायरेक्टर रो.अनघा दातार यांनी केले. उपस्थित शिक्षकांच्या वतीने प्रातिनिधिक दोन शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.

डिस्ट्रिक्ट मध्ये वाई रोटरी क्लबच्या आत्तापर्यंत झालेल्या ग्लोबल ग्रँट च्या कामाची माहिती दिली. रोटरी सामाजिक काम कसे करते,ते करताना सेवा भाव हाच महत्वाचा असतो.अशी काम करणारी रोटरी ही जगातील सर्वात मोठी NGO आहे. २३फेब्रुवारी २०२४ रोजी रोटरी संस्थेला ११९वर्ष पूर्ण झाली.त्यानिमित्ताने सर्व डिस्ट्रिक्ट मध्ये,वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक काम क्लब मार्फत करण्यात आले. या निमित्ताने ऐकून ७०० ग्रंथालय कपाटांचे वितरण करण्यात आले.

आभार क्लब सेक्रेटरी रो.संतोष निकम यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी ,२५शाळेचे शिक्षक,वाई रोटरी क्लब चे सर्व सदस्य, पत्रकार आणि वाईकर उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!