रिक्षा असो किंवा मर्सिडिज प्रत्येकाला हळवा करणारा आवाज हरपला
![]()
पंकज उधास यांचं निधन गझल हृदयाला भिडवणारा जादुई आवाज शांत!
भुईंज: महेंद्रआबा जाधवराव :
चिठ्ठी ना कोई संदेश, और आहिस्ता किजिए बाते, यांसारखी अनेक गाणी आजच्या पिढीचीही फेव्हरेट आहेत. ही गाणी ज्यांनी गायलीत तो आवाज आज हरपला आहे.
गायक पंकज उधास यांचं निधन सर्व चाहत्यांच्या अन् सिने इंडस्ट्रीच्या मनाला उदास करून गेलं. पंकज उदास यांची अनेक गाणी आजही आजरामर आहेत. काळ पालटला असला तरी देखील ती गाणी आजही काळजाला भिडतात.
‘और आहिस्ता किजीए बातें’
पंकज उदास यांनी अनेक गाणी गायली आहेत. त्यांचे ‘और आहिस्ता किजीए बातें’ हे गाणे तर कल्पने पलिकडली लव्ह स्टोरी सांगते. एका भारतीय मुलीची परदेशातील एका मुलासोबत ओळख होते, त्याला इडियन कल्चर आवडतं. अन् तो तिला साडी देऊन लग्नाची मागणी घालतो. हे गाणं ९० च्या दशकातील गोल्डन स्टोन ठरले असेल यात शंका नाही.
ना कजरे की धार ना मोतियो के हार फिरभी तूम कितनी सुंदर हो!
लग्नाच्या प्रत्येक व्हिडिओत नवरीचा श्रृंगार सुरू झाला की हेच गाणं लागतं. ते म्हणजे पंकज जींच्या आवाजातलं ‘ना कजरे की धार ना मोतियो के हार फिरभी तूम कितनी सुंदर हो!’
जीए तो जीए कैसे बिन आपके
एखादा मुलगा जेव्हा एखाद्या मुलीला प्रपोज करण्याचा विचार करत असतो तेव्हा हमखास या गाण्याची आठवण येते. जेव्हा तिला पटवून द्यायचं असतं की, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तेव्हा पंकज जींचे हे गाणे आठवते ‘जीए तो जीए कैसे बिन आपके’
चिठ्ठी आई है
भारताच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी चिठ्ठी आई है ही अजरामर गझल त्यांनी गायली. ज्यात आपल्या घरापासून दूर असलेल्या लोकांच्या भावना त्यांनी अनमोल शब्दात व्यक्त केल्या आहेत.
वो लडकी जब घर से बाहर निकलती है!
प्रेमात पडलेल्या व्यक्तीची आतुरतेनं वाट पाहणारं प्रेम त्यांनी या गीतातून दाखवलं आहे.
खुदा करे की महोब्बत में वो मकाम आये!
सतत माझ्या ओठांवर प्रियसीचेच नाव रहावे, अशी मागणी देवाकडे करणारा एक प्रियकर या गाण्यातून आपल्याला भसतो.
छुपाना भी नही आता, जताना भी नही आता
९० च्या दशकातील अनेक लोकांचे हे गाणे फेवरेट होते. कारण ज्यात प्रेम असूनही व्यक्त न करणे किती त्रासदायक ठरू शकतं हे पंकजजींनी दाखवलं आहे.
आज फिर तूम पे प्यार आया है!
माधूरी दिक्षित आणि विनोद खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे रोमँटीक गाणं होतं, आज फिर तूम पे प्यार आया है!
गझल ऐकायची नसते तर ती अनुभवायची असते. गझल रोमांरोमांत भिनते. गझल कानापर्यंत नाही तर थेट हृदयाला जाऊन भिडते. गझलचे दुसरे नाव आहे, ‘असर’. ऐकणा-यावर गझलेचा परिणाम होणार आणि होणारच. कोई भी गजल के असर से बच नहीं सकता हे सांगणारे पंकजजी सर्वांनाच उदास करुन गेले.
संकल्प न्यूज व संकल्प प्रतिष्ठान यांचेवतीने या गझल सम्राटास
!! भावपूर्ण श्रद्धांजली !!













