Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याची प्रक्रिया सात दिवसात पूर्ववत न झाल्यास सहा. संचालक, नगररचना, सातारा यांच्या दालनासमोर जनआंदोलन छेडणार – महारूद्र तिकुंडे

ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याची प्रक्रिया सात दिवसात पूर्ववत न झाल्यास सहा. संचालक, नगररचना, सातारा यांच्या दालनासमोर जनआंदोलन छेडणार – महारूद्र तिकुंडे
Ashok Ithape
  • PublishedFebruary 21, 2024

बांधकाम व बिनशेती प्रकरणे ऑफलाईन स्विकारण्याची केली मागणी

भुईंज :- महेंद्रआबा जाधवराव :

एकतर तात्काळ ऑनलाईन प्रणाली सुरू करा, नाहीतर ऑफलाईन पध्दतीने बांधकाम व बिनशेती प्रकरणे स्विकारा अन्यथा 26 फेब्रुवारीपासून सहा.संचालक नगररचना यांच्या दालना बाहेर जनआंदोलन छेडावेच लागेल असा इशारा महरूद्र तिकुंडे यांनी दिला.

सहा.संचालक नगररचना सातारा यांच्याकडे निवेदन देत त्यांनी ऑफलाईन पध्दतीने प्रकरणे स्विकारा अशी विनंती केली आहे. दिलेल्या निवेदनाबद्दल माहिती देताना महारूद्र तिकुंडे म्हणाले कि, महाराष्ट्र शासनाने एकत्रित नियमावलीची बांधकाम व बिनशेती परवानगीची सुरू केलेली ऑनलाईन प्रणाली म्हणजे असून अडचण नसून खोळंबा आहे. ही प्रणाली व्यवस्थित चालू होत नाही तोपर्यंत पूर्वीप्रमाणेऑफलाइन प्रकरणे स्वीकारण्यात यावी.ही प्रक्रिया येत्या सात दिवसात न झाल्यास. 26 फेब्रुवारी 2024 रोजी सहा. संचालक, नगररचना, सातारा, यांचे दालनासमोर जनआंदोलन करणार असल्याचे तिकुंडे यांनी इशारा देत सांगितले.

अनेक दिवसांपासून बांधकाम व बिनशेतीची प्रणाली तांत्रीकदृष्टया व्यवस्थित चालत नाही. या प्रणालीमुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत असल्याचे तिकुंडे यांनी सांंगितले. तसेच सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायीकांना बांधकाम परवानग्यांसाठी दैनंदिन स्वरूपात अथक अडचणींचा सामाना करावा लागत असल्याचे वास्तव आहे.

महाराष्ट्र शासनाने एकत्रित नियमावलीची बांधकाम व बिनशेतीची मंजुरीची प्रकरणे वेळेत व विना त्रासाची व्हावीत यासाठी ऑनलाईन स्वरूपात सुरू केलेल्या प्रणालीचे कामकाज अस्तित्वात आल्यादिवसांपासून पूर्णपणे सदोष राहिले आहे. त्यामुळे सर्वसामान्याबरोबर व्यवसायिकांना बांधकाम परवानगी घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

ऑनलाईन प्रणालीचे कामकाज पूर्णपणे ठप्प असल्याने लोकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यावर नगररचना कार्यालयाकडून कोणतेही ठोस कार्यवाही होत नसल्याचे दुर्देवी चित्र आहे. अनेक प्रकरणे विनासायास प्रलंबित आहेत. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.

संबधीत ऑनलाईन प्रणाली जोपर्यंत व्यवस्थित चालू होत नाही, तोपर्यंत पूर्वीप्रमाणे ऑफलाइन प्रकरणे स्वीकारण्यात यावी अशी विनंती महारूद्र तिकुंडे यांनी केली आहे तसेच ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याची प्रक्रिया सात दिवसात पूर्ववत न झाल्यास सहा. संचालक, नगररचना, सातारा यांच्या दालनासमोर जनआंदोलनाचा पवीत्रा घेणार असल्याचा इशारा देखील महारूद्र तिकुंडे यांनी दिला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!