Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा

गौरीशंकर लिंब कॅम्पस मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

गौरीशंकर लिंब कॅम्पस मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
Ashok Ithape
  • PublishedFebruary 19, 2024

शिवछत्रपतींच्या प्रगल्भ वैचारिकतेचे पालन प्रत्येकाने करावे – श्रीरंग काटेकर.

भुईंज। महेंद्रआबा जाधवराव

धैर्य साहस व पराक्रमाचा इतिहास घडविणारे छत्रपती शिवरायांच्या प्रगल्भ विचरिकतेचा वारसा पुढे घेऊन जाऊन त्याचे पालन प्रत्येकाने करावे असे मत गौरीशंकराचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते लिंब . ता. जि. सातारा येथील गौरीशंकर लिंब कॅम्पस मधील विविध महाविद्यालयात आयोजीत केलेल्या शिवजयंती उत्सव सोहळ्यात बोलत होते.

गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविघालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ.अजित कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव, डॉ. संतोष बेल्हेकर, डॉ. धैर्यशील घाडगे डॉ.भूषण पवार, डॉ स्फूर्ती साखरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. माधुरी मोहिते, प्रबंधक निलेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते .

प्रारंभी शिवप्रतिमेचे पूजन गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून शिवछत्रपतींच्या रयतेच्या कल्याणकारी राज्यकारभारा विषय प्रबोधन पर कार्यक्रम सादर केला. शिवछत्रपतींच्या कार्यकर्तुत्वाचा ज्वलंत इतिहास विषय साक्षी वारागडे, राहुल झांजे, सुमित माळी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन शंतनू काळे यांनी केले.

जय भवानी जय शिवराय असा जयघोष करीत गौरीशंकरच्या डॉ पी.व्ही.सुखात्मे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लिंब गावात शिवजयंती उत्साहात साजरी केली विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून रॅली काढून ग्रामस्थांची मने जिंकली. तसेच संपूर्ण गाव शिवमय केले शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व चैतन्य पाहून ग्रामस्थांकङून विद्यार्थ्यांचे कौतुक झाले. प्रभारी प्राचार्य घनशाम चव्हाण व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यामध्ये सामील झाले होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!