Mon, Mar 2, 2026
शिक्षण

महात्मा गांधी विद्यालय पाचवड येथे एस. एस. सी व एच. एस. सी. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

महात्मा गांधी विद्यालय पाचवड येथे एस. एस. सी व एच. एस. सी. विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
Ashok Ithape
  • PublishedFebruary 17, 2024

पाचवड l प्रतिनिधी:

पाचवड विद्यालय मध्ये 10वी 12वी विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी मध्य विभाग, रयत शिक्षण संस्थाचे सहाय्यक विभागीय अधिकारी मा. श्री दिनेश दाभाडे हे  अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुनील महामुलकर मुख्याध्यापक यशवंत स्कूल कराड हे उपस्थित होते. तर श्री.दत्ताशेठ बांदल श्री. प्रकाश पारखे व श्री. भारत गायकवाड हे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य उपस्थीत होते.

विद्यार्थ्यांनी वेळेचे  व परीक्षेचे नियोजन करून सराव करावा असे मत महामुलकर सर यांनी व्यक्त केले.

तर घोका व ओका  शिक्षण पद्धती बंद झाली असून कृतिशील शिक्षण पद्धती असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सजगतेने अभ्यास करावा  तर निश्चित उज्वल यश मिळते असे मत सहाय्यक विभागीय अधिकारी मा. दाभाडे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात गुणवंत शिक्षक श्री. शिवाजी जंगम यांचा तंत्रस्नेही शिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला. एन एम एम एस व इंटरमिजिएट, एलिमेंटरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्य रुपी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस.बी.खरात यांनी केले .पाहुण्यांचा परिचय व स्वागत श्री बाळासाहेब कचरे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. जे. डी भोसले मॅडम यांनी केले.
तर आभार श्री. गोरख खाडे यांनी मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!