भुईंजमधील आदरातिथ्याने भारावले भारतीय सैन्य दलातील जवान
भुईंज : बेळगाव ते सिंहगड या सायकल मोहिमेवर असणार्या भारतीय सैन्य दलाच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांचे भुईंजमध्ये स्वागत करुन दोन दिवस आदरातिथ्य करण्यात आले. माहेर योग कला क्रीडा धाममध्ये झालेल्या दोन दिवसीय आदरतिथ्यासोबत भुईंजच्या पारायण सोहळ्यात झालेल्या सन्मानाने सैन्यदलातील सारे जवान भारावून गेले.
नरवीर तानाजी मालुसरे यांनी 4 फेब्रुवारी रोजी सिंहगड सर केला. त्या दिवसाची स्मृती जपण्यासाठी हा दिवस मराठा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने सैन्य दलाच्या वतीने 4 फेब्रुवारी ते शिवजयंती 19 फेब्रुवारीपर्यंत सायकल मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेदरम्यान विविध गडाकोटांना भेट देत तोरणा व सिंहगडच्या दिशेने जाताना हे सर्व सायकलस्वार भुईंज येथे आले. येथील सायकल वेडे ग्रुपच्या वतीने या सायकलस्वार जवानांचे स्वागत करुन त्यांची सागर दळवी यांच्या माहेर धामात दोन दिवस निवासाची व्यवस्था करण्यात आली.
पारायण सोहळ्यात रामदासबापू जाधव यांनी या जवानांचा सन्मान केला. तसेच माहेर येथे झालेल्या विशेष सोहळ्यात उद्योजक अंकुश शिंदे यांच्या हस्ते मेजर संदीप कुमार व त्यांच्या सर्व सहकार्यांसह पारायण सोहळा यशस्वी पार पाडल्याबद्दल रामदासबापू जाधव, जगन्नाथअण्णा दगडे, जयवंतराव पिसाळ, पारायण सोहळा पुन्हा दिमाखदार व लोकोत्सव करण्यासाठी झटणार्या तरुणाईचे प्रतिनिधी आशिष भोसले पाटील, अनिल लोखंडे, दिनेश देशमुख, घनशाम जाधवराव, दत्ता पोळ व त्यांच्या सहकर्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव, महालक्ष्मी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा संजीवनी दळवी, दिलीप दळवी, बाळकृष्ण भोसले, वाई तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विलास साळुंखे, पांडुरंग खरे, योगेश शिर्के, बाळासाहेब पवार, जयप्रकाश सावंत, गुलाबराव निकम, प्रबोधिनी तांबोळी, पूनम दळवी, स्नेहल जाधव, श्रद्धा पवार, वरद क्षीरसागर, हर्ष शेवते, विवेक दळवी, उत्कर्ष दळवी आदी उपस्थित होते.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
रोमांचित करणारी मानवंदना
भारतीय सैन्य दलातील सुमारे 21 जवानांचे आदरतीथ्य करताना माहेर धामात त्यांच्याशी गप्पांचा विशेष कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या सांगतेवेळी बाळकृष्ण भोसले यांनी या जवानांना मानवंदना देण्याची कल्पना मांडली. त्यावेळी सर्व उपस्थितांनी या जवानांना सलामी देवून मानवंदना दिली त्यावेळी सारे वातावरण रोमांचित झाले आणि सर्वांच्या चेहर्यावर कृतज्ञनतेची भावना दाटून आली. या अभिनव संकल्पनेबद्दल बाळकृष्ण भोसले यांचे सर्वांनी आभार मानले.













