माँ भगवती शारदा (सरस्वती) पुरस्काराने मा. श्री चंद्रकांत दळवी, सन्मानीत
पुणे l प्रतिनिधी:
श्री. शारदा प्रबोधिनी पिंपळगाव (घोडे), पुणे
यांच्या तर्फे दर वर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा मा.श्री चंद्रकांत दळवी, चेअरमन, रयत शिक्षण संस्था यांना मा. श्री.दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
दळवी साहेबांनी पुरस्काराच्या रकमेमध्ये पंचवीस हजार रुपये देऊन रुपये 1.25 लक्ष देणगी रयत शिक्षण संस्थेस देत असल्याचे यावेळी जाहीर केले .
अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये मा.श्री. सुरेश वाडकर, मा .डॉ जयंत नारळीकर, मा. श्री. बाबासाहेब पुरंदरे, डॉ. सदानंद मोरे , मा.श्री. हणमंत गायकवाड , मा. डॉ . के.एस संचेती , मा.श्री.आचार्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, खजिनदार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्या आणि मा. डॉ. रघुनाथ माशेलकर आदीं मान्यवरांचा समावेश आहे.













