Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

साताऱ्यात दि. १७ फेब्रु. ते १९ फेब्रु. या कालावधीत भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन

साताऱ्यात दि. १७ फेब्रु. ते १९ फेब्रु. या कालावधीत भव्य शिवजयंती महोत्सवाचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedFebruary 15, 2024

भुईंज l महेंद्रआबा जाधव :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवजयंती महोत्सव समिती राजधानी सातारा यांच्यावतीने ऐतिहासिक शाहूनगरीत दि. १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत भव्य शिवजयंती महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समितीचे अध्य्क्ष आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.

शनिवार दिनांक १७ रोजी सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान राजवाडा येथे महाराष्ट्राचे शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप प्रस्तुत ख्यातनाम, प्रसिद्ध कलाकार नंदेश उमप निर्मित शिव सोहळा हा ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत शिवरायांच्या सर्व ऐतिहासिक घटना आणि पराक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येणार आहेत. जाणता राजा या कर्यक्रमानंतर साताऱ्यात प्रथमच घोडे आणि १०० कलाकारांचा सहभाग असलेला भव्यदिव्य असा शिव सोहळा हा कर्यक्रम होणार असून याचा लाभ तमाम सातारकरांनी घ्यावा.

रविवार दिनांक १८ रोजी सायंकाळी ५ वाजता किल्ले अजिंक्यतारा येथे भव्य मशाल महोत्सव होणार असून हजारो मशालींनी किल्ले अजिंक्यतारा उजळून निघणार आहे. चला सातारकरांनो आपणही आपला सहभाग नोंदवूया आणि एक मशाल माझ्या राजासाठी स्वतः लावूया, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच सुनिल बापू लाड (कवलापूर) सांगली यांचे व्याख्यान होणार असून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सातारा शहरातील काही संस्था व व्यक्ती यांचा सन्मान केला जाणार आहे.

सोमवार दिनांक १९ रोजी सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान येथून भव्य आणि विराट शिव मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे केरळ येथील १०० कलाकारांचा सहभाग असलेले प्रसिद्ध केरळ वाध्यपथक ! या शाही मिरवणुकीत हत्ती, घोडे, उंट यासह ऐतिहासिक देखावे असणार आहेत.

या मिरवणुकीचा समारोप पोवई नाका येथे होणार असून रात्री ८.३० वाजता शिवतीर्थ येथे छत्रपती शिवरायांची आरती तसेच फटाक्यांची नयनरम्य आतिषबाजी होणार आहे. मिरवणुकीत आणि आरती कार्यक्रमात सर्वांनी सहभागी घेऊन आपल्या लाडक्या राजाला मानवंदना द्यावी, असे वाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.
या भव्यदिव्य, ऐतिहासिक शिवजयंती महोत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन सोहळ्याचा प्रत्येक ऐतिहासिक क्षण याची देही याची डोळा पाहण्याची संधी सातारकरांनी दवडू नये, असे आवाहन समितीने केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!