तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सायुरी सणस, शंतनू जगताप, सायली चव्हाण, स्वरांजली भोसले प्रथम
वाई l दि. १३:
महासंस्कृती अभियानांतर्गत तालुकास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेत सायुरी सणस, शंतनू जगताप सायली चव्हाण व स्वरांजली भोसले यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये झालेल्या या स्पर्धेतील गुणानुक्रमे गटवार विजेते याप्रमाणे- इयत्ता अकरावी बारावी: सायुरी उमेश सणस (किसन वीर महाविद्यालय वाई), सिद्धी सचिन पवार (कन्या शाळा, वाई) व उन्नती नवनाथ आगुंडे (क.भा.पा. विद्यालय भुईंज),
इयत्ता नववी, दहावी गट: शंतनु शिवाजी जगताप (त.ल. जोशी विद्यालय, वाई), आयुष अनिल व्याहळीकर (विद्यासागर विद्यालय,व्याहळी),व स्वरांजली गणपत जाधव द्रविड हायस्कूल, वाई)
इयत्ता सहावी ते आठवी गट:सायली संतोष चव्हाण (व्याहळी पुनर्वसन), ज्ञानेश्वरी सचिन येवले (पसरणी) व साईराज दिगंबर निकम (शेंदुरजणे) आणि तनया प्रकाश सणस (रेणावळे) दोघेही तृतीय.
इयत्ता तिसरी ते पाचवी गट:स्वरांजली रामभाऊ भोसले (चाहुर क्र. २), राधिका राहुल घाडगे (बेलमाची) व ज्ञानश्री मंगेश सूर्यवंशी (केंजळ)
स्पर्धेचे पारितोषिक वितरण नगरपरिषद प्रशासनाच्या सहआयुक्त पल्लवी पाटील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नायब तहसीलदार वैशाली घोरपडे, प्रशासनाधिकारी साईनाथ वाळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
परीक्षक म्हणून बाळासाहेब कोकरे, के. आर. पोतदार, अंजुम मोकाशी,नीता गोंजारी,विद्या साळी व मिलिंद कुमठेकर यांनी काम पाहिले.













