शंभर वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्णत्वाला गेले.

भुईंज। महेंद्रआबा जाधव :
पत्रकार भवनाच्या स्वप्नपूर्ती सोहळ्याला सातारा जिल्ह्यातील आमच्या सर्व बांधवांनी जी अलोट गर्दी केली, जे प्रेम दाखवले, जो विश्वास व्यक्त केला, त्याबद्दल मी आपला अंत:करणापासून ऋणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दाखवलेले दातृत्व, त्यांना त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी दिलेली साथ यामुळे हे स्वप्न पूर्णत्वाला जाऊ शकले.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख ,किरण नाईक, शरद पाबळे, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांच्यासह राज्यातील नामवंत पत्रकारांची उपस्थिती व जिल्ह्यातील सर्व संपादक महोदयांच्या उपस्थितीने या सोहळ्याला चार चाँद लागले. जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमातील सर्व बांधवांनी या सोहळ्यात सामील होऊन स्वप्नपूर्तीचा आनंद साजरा केला.
असेच एकत्र राहू या ,एकमेकांच्या सुखदुःखात सामील होऊया, साताऱ्याची पत्रकारिता अजरामर करूया. या सोहळ्यासाठी झटणाऱ्या सर्व सहकारी मित्रांचे सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने मनापासून आभारी आहे.
सदैव तुमचे
हरिश पाटणे व सर्व सहकारी मित्र.













