Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा

सातारा बिल्डर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाची बांधकाममंत्री ना.रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मुंबई येथे बैठक

सातारा बिल्डर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाची बांधकाममंत्री ना.रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मुंबई येथे बैठक
Ashok Ithape
  • PublishedFebruary 9, 2024

बिल्डर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळास बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथे बैठकीसाठी बोलावल्याने लवकरच ठेकेदारांच्या प्रलंबित बिलासंदर्भात योग्य तोडगा निघून ठेकेदारांना न्याय मिळेल; बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन देशमुख यांचा विश्वास..

भुईंज महेंद्र (आबा) जाधव :

जिल्ह्यातील सरकारी ठेकेदारांची कोट्यवधींची बिले गेल्या दीड वर्षापासून बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहेत. ही बिले मिळावीत, यासाठी सरकारी ठेकेदारांनी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले, तसेच ही प्रलंबित देयके तातडीने द्यावीत व ठेकेदारांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढावे, अशी मागणी केली.

बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सरकारी ठेकेदारांनी आज मंत्री रवींद्र चव्हाण यांची शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. या वेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
बांधकाम मंत्री चव्हाण यांनी येणा-या अर्थ संकल्पिय अधिवेशनापूर्वी सर्व सरकारी ठेकेदारांची बैठक मुंबईत घेणार असून, त्यातून प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन दिले.

या वेळी सचिन देशमुख म्हणाले, “सरकरी ठेकेदारांच्या विविध मागण्यासंदर्भात आम्ही श्री चव्हाण यांना निवेदने दिले आहे. प्रामुख्याने ठेकेदारांनी दीड वर्षापासून बांधकाम विभागाकडे प्रलंबित असलेली सर्व बिले मिळावीत, अशी आम्ही मागणी केली, तसेच यापूर्वीही आम्ही अनेकदा आंदोलने केलेली आहेत. अधिवेशनाच्या काळातही अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे समस्या मांडल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच तोडगा निघेल व सरकारी ठेकेदार आर्थिक अडचणीत आहेत. देयकांबाबत निधी उपलब्ध करतील असे आश्वासन ना.श्री. चव्हाण यांनी दिले आहे. तसेच बिल्डर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळास मुंबई येथे बैठकीसाठी बोलावले आहे. लवकरच यावर योग्य तोडगा निघून ठेकेदारांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!