Thu, Jan 15, 2026
कृषी वार्ता

भारतातील पहिला अनोखा प्रयोग महाराष्ट्रातील वाई तालुक्यात लालबुंद नाही तर पांढऱ्या शुभ्र स्ट्रॉबेरीची लागवड

भारतातील पहिला अनोखा प्रयोग महाराष्ट्रातील वाई तालुक्यात लालबुंद नाही तर पांढऱ्या शुभ्र स्ट्रॉबेरीची लागवड
Ashok Ithape
  • PublishedFebruary 9, 2024

भुईंज l महेंद्रआबा जाधव :

वाईमधील फुलेनगर इथं चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेण्यात आलंय. प्रयोगशील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरात पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केलीय.

स्ट्रॉबेरीचे फळ नेहमीच सर्वांना त्याच्या लालचुटूक रंगामुळे आणि स्वादामुळे आवडते. स्ट्रॉबेरी म्हटले की त्याचा रंग लालच असणार हे गृहीतक ठरलेले. परंतू आता आपल्याला लवकरच पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीचे दर्शन होणार आहे. एका शेतकऱ्यांना पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीचे पिक घेतले आहे. तर पाहूयात पांढरी स्ट्रॉबेरी कशी आहे ते…

चवीला गोड किंचित आबंट असणारी स्ट्रॉबेरी तुम्हाला आवडत असेल तर आता नवीन स्ट्रॉबेरी बाजारात येणार आहे. स्ट्रॉबेरी नेहमी लालच असते असे आपण पाहीले असेल. परंतू महाराष्ट्रातील एका शेतात अनोखी पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, भिलार आणि वाई परिसरात स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. आता सातारा येथील वाईच्या फुले नगरात राहणाऱ्या शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीची शेती केली आहे.

सातारा येथील वाईच्या फुलेनगरातील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरात पांढऱ्या स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला आहे. या स्ट्रॉबेरीची त्यांनी बाजारात विक्री देखील सुरु केली आहे. लवकरच या अनोख्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लवकरच ऑनलाईन विक्री देखील केली जाणार आहे. या स्ट्रॉबेरीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची किंमत 1000 पासून 1500 रुपये किलोपर्यंत आहे. या स्ट्रॉबेरीची उत्पन्न सहा पट जास्त असल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

अमेरिका आणि ब्रिटनचा प्रयोग

या पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीचा पहिला प्रयोग अमेरिका आणि इंग्लंडमध्ये झाला होता. या स्ट्रॉबेरीचे नाव फ्लोरिडा पर्ल असे आहे. भारतात या जातीची स्ट्रॉबेरी पहिल्यांदाच लावण्यात आली आहे. या पांढऱ्या शुभ्र रंगाच्या स्ट्रॉबेरीची शेती प्रथमच करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीच्या शेतीचा प्रयोग इतरत्र देखील करण्यात येणार आहे. भारतात पांढरी स्ट्रॉबेरी उगविण्याचा पहिला मान सातारा वाईच्या शेतकरी उमेश खामकर यांच्या नावावर जमा झाला आहे. यासाठी त्यांनी फ्लोरीडा युनिव्हर्सिटीतून रॉयल्टी राईट्स विकत घेतले आहे. आता भारतात कोणाला याची शेती करायची असेल तर उमेश खामकर यांच्याकडून हक्क विकत घ्यावे लागतील.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!