बावधन ता. वाई येथील साहित्यिक डॉ.जनार्दन पांडुरंग भोसले यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार जाहीर
![]()
बावधन ता वाई येथील साहित्यिक डॉ जनार्दन पांडुरंग भोसले २०२४ सालचा राज्यस्तरीय
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य पुरस्कार जाहीर
भुईंज। महेंद्रआबा जाधव :
मातंग साहित्य परिषद, पुणे चे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी जाहीर केले आहे. डॉ जनार्दन भोसले यांनी लिहिलेल्या “फ. म. शहाजिंदे यांच्या कवितेतील निधर्मीवाद ” या साहित्य कलाकृतीची सन २०२४ च्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाड्मय पुरस्काराच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी निवड केली गेली आहे.
सदर पुरस्कारामुळे आपल्या लेखन कार्यास गती व साहित्यिक क्षेत्रात प्रसिध्दी मिळेल अशी अपेक्षा आहे. ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असेल. ह्या पुरस्काराचे वितरण मातंग साहित्य परिषद, पुणे ह्यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनामध्ये करण्यात येत आहे. ह्या साहित्य संमेलनाचे आयोजन राजवाडा लॉन्स, राजवाडेनगर, तापकीर मळा चौकाजवळ, पवनेश्वर मंदिर रोडलगत, काळेवाडी, पिंपरी, पुणे-१७ (पिंपरी गाव ते काळेवाडी रोडलगत) येथे दि. ११/०२/२०२४, रवि. रोजी करण्यात येणार आहे.
हे साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे ह्यांच्या अध्यक्षतेखाली व स्वागताध्यक्ष मा. शंकरशेठ जगताप (अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा) ह्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषा, साहित्य, संस्कृती ह्यांच्याविषयीच्या विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. या निवडी बद्दल त्यांचे पुणे वाई सातारा येथील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विभागातून आभिनंदन होत आहे













