Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा सामाजिक

जावली तालुक्यात सापडल्या २ हजार ५९५ कुणबी नोंदी

जावली तालुक्यात सापडल्या २ हजार ५९५ कुणबी नोंदी
Ashok Ithape
  • PublishedFebruary 7, 2024

भुईंज। महेंद्रआबा जाधव

जावली तालुक्यातील मराठा कुणबी नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आतापर्यंत विविध गावातील २ हजार ५९५ मराठा कुणबी नोंदी सापडल्या असल्याची माहिती तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी दिली.

मराठा कुणबी तपासण्यासाठी तहसिल कार्यालयात मराठा कुणबी पुरावा संकलन कक्ष स्थापन करण्यात आला असून आतापर्यंत १७ लाख ११ हजार ७३५ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. यासाठी मराठा कुणबी नोंदी असणारे जन्म मृत्यू रजिस्टर, क पत्रक, कुळकायदा नोंदी, सातबारा, नमुना नंबर १ नोंदवही आदी अभिलेख तपासण्यात आले आहेत.

मराठी भाषेत नोंदी असणाऱ्या २ हजार ५९५ मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. तर १८ गावामध्ये ३ हजार ४४८ मोडिलिपीतील नोंदी आढळून आल्या आहेत. अशा एकूण ६ हजार ४३ नोंदी आढळून आल्या असून मोडिलिपीतील तपासणी काम चालू आहे. याकामी नायब तहसीलदार सुनिल मुनाळे, महसूल अधिकारी संजय बैलकर व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

दरम्यान, मोडी लिपीतील रेकॉर्ड फार जुने असून ते हाताळताना वेळ लागत आहे. मोडी लिपी तज्ज्ञांची संख्या मर्यादित आहे. वंशावळीबाबत एकत्र पुरावे घेऊनच अर्ज करावेत, असे आवाहन तहसिलदार हणमंत कोळेकर यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!