Thu, Jan 15, 2026
अध्यात्म साहित्य

भुईंजच्या कृष्णा काठावरील व्याख्यानमाला ही ख-या अर्थान नव्या पिढीला उर्जा देणारे ज्ञानपीठ

भुईंजच्या कृष्णा काठावरील व्याख्यानमाला ही ख-या अर्थान नव्या पिढीला उर्जा देणारे ज्ञानपीठ
Ashok Ithape
  • PublishedFebruary 7, 2024

भुईंजची ज्ञानसत्र कृष्णा काठावरील व्याख्यानमाला ही ख-या अर्थान नव्या पिढीला उर्जा देत संस्कार देणारे ज्ञानपीठ ठरेल असे उपक्रम गावोगावी झाल्यास समाज व्यवस्था योग्य दिशेने जाईल असे प्रतिपादन राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले.

भुईंज l प्रतिनिधी:

भुईंज येथील आचार्य भृगूऋशी मठावर ज्ञानसत्र कृष्णा काठावरील व्याख्यानमाला शुभारंभ प्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर वोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ निवेदक व पत्रकार विठ्ठल माने तर प्रमुख उपस्थितीत सरपंच विजय वेळे, भुईंज विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मदन शिंदे, व्हा. चेअरमन नारायण धुरगुडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महेश पालकर पुढे म्हणाले की भुईंजचा कृष्णा काठ व निसर्ग सौदर्य हे पाहत असताना येथील आचार्य भृगूमहर्षीच्या आश्रमात होणारे ज्ञानदान विचार मंथन हे या व्याख्यानमालेचे खरे ज्ञानसंचय करणारी ठेव ठरेल जी भविष्यातील पिढीला मुद्धा उपयोगी ठरेल असे म्हणत त्यांनी संत परंपरेतील अनेक संताचे दाखले दिले.

कार्यक्रमास सरपंच विजय वेळे, भुईज विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मदन शिंदे, व्हा. चेअरमन नारायण धुरगुडे, उद्योगपती रामभाऊ वारागडे, विजयसिंह जाधवराव उर्फ पिंटूकाका, सुनिल शेवते, जगन्नाथ दगडे, वजरंग अडसूळ, धनश्याम जाधवराव, आशिष भोसले पाटील आदी उपस्थित होते.

प्रारंभी संयोजकांच्यावतीने शिक्षण संचालक महेश पालकर व मान्यवरांचा मानाचा फेटा, उपरणे व पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक कार्यवाहक रामदास जाधव यांनी केले, आभार अध्यक्ष पांडुरंग शेवते यांनी मानले सुत्र संचलन पत्रकार जयवंत पिसाळ यांनी केले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!