Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

नागरी वस्ती सुधारणा : आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा. विकास कामांसाठी ६ कोटी

नागरी वस्ती सुधारणा : आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पाठपुरावा. विकास कामांसाठी ६ कोटी
Ashok Ithape
  • PublishedFebruary 6, 2024

भुईंज।महेंद्रआबा जाधव

सातारा शहरातील असंख्य विकासकामे मार्गी लावणाऱ्या आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुरताव्यातून नवीन १९ विकासकामे मार्गी लावण्यासाठी तब्ब्ल ६ कोटी ७८ लाख ५८ जाहीर ८३६ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. शासनाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

शहरातील सदरबझार लक्ष्मी टेकडी, भानुदास पवार घर ते सुदाबाई कडाळे, सुंदर ओव्हाळ घर आणि रणदिवे दुकान ते बल्ला घर अखेर रस्ता काँक्रीट करणे व गटर करणेसाठी ३९३६५१२ रुपये, चारभिंती मुख्य रस्ता लगत झोपडपट्टी जवळ रिटेनिंग वॉल बांधणे १३००४९३ रुपये, गोडोली बागडी वाडा येथे रस्ता काँक्रीट करणे ७१७२५३ रुपये, गोडोली मस्के कॉलनी येथे रस्ता काँक्रीट करणे २९७२२०५ रुपये, सी.स.न. १५२ भीमाबाई आंबेडकर चौक, सदरबझार सातारा येथे उद्यानामध्ये फूड स्टॉल व इतर कामे विकसित करणे ८७२१४८१ रुपये, मिलिंद हौसिंग सोसायटी उद्यान येथील उर्वरित विकासकामे करणे २९०६९२६ रुपये, गुरुवार पेठ दलित वस्ती येथे गटर रस्ते व रिटेनिंग वॉल करणे ४५२९७०७ रुपये, प्रभाग क्र. १९ सि.स. नं. २७८ रामाचा गोट ते कुरेशी घर ते खारी विहीर अखेर कॅनॉल टाईप गटर करणे ८२८६६१० रुपये, मंगळवार पेठ ४०१ झोपडपट्टी नितीन लोहार घर ते राकेश कांबळे ते तानाजी घाडगे घर अखेर रस्ता काँक्रीट करणे ७७८२७१ रुपये निधी मंजूर झाला आहे.
मंगळवार पेठ सि.स. नं. ४०८ सयाजी घर ते रविंद्र माने घर अखेर रस्ता काँक्रीट करणे ६७४६९३ रुपये, नालंदा नगर येथील उर्वरित कामे करणे ७४७७९३२ रुपये, ट सि.स. नं. २७८ रामचा गोट येथील सार्वजनिक शौचालय बांधणे ८१८७५३ रुपये, मंगळवार पेठ मातोश्री नगर येथे त सार्वजनिक शौचालय बांधने ७९९३१९, त ४४६ आशीर्वाद नगर येथे सार्वजनिक क शौचालय बांधणे ७९९३१९ रुपये, मंगळवार पेठे संत कबीर सोसायटी येथे भ सार्वजनिक शौचालय बांधणे ७९९३१९ रुपये, पंतांचा गोट येथील रस्ते गटर व पाईप ड्रेन करणे ४२३७२८९ रुपये निधी मंजूर झाला आहे.
प्रभाग क्र. १९ वेताळ बाबा मठ येथील खुल्या जागेत ५ लक्ष लिटर क्षमतेची टाकी बांधणे १११९८५५४ रुपये, मल्हार पेठे अंतर्गत रस्ता काँक्रीट करणे ३७२८२७४ रुपये, प्रभाग क्र. १९ किरण ढोणे ते
३८९५९२६ रुपये निधी उपलब्ध झाला आहे.

तातडीने निविदा प्रक्रिया राबवा

तातडीने निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार पूर्ण करून कामे सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!