Tue, Mar 3, 2026
सामाजिक

भुईंज येथील मुस्लिम समाज मस्जिद ट्रस्टच्या विकास कामांसाठी भरघोस केंद्रीय निधी देण्याबरोबरच मुस्लिम ट्रस्टला सर्वतोपरी सहकार्य करु – केंद्रीय मंत्री ना. श्री. रामदासजी आठवले

भुईंज येथील मुस्लिम समाज मस्जिद ट्रस्टच्या विकास कामांसाठी भरघोस केंद्रीय निधी देण्याबरोबरच मुस्लिम ट्रस्टला सर्वतोपरी सहकार्य करु – केंद्रीय मंत्री ना. श्री. रामदासजी आठवले
Ashok Ithape
  • PublishedFebruary 5, 2024

भुईंज येथील मुस्लिम समाज मस्जिद ट्रस्टच्या विकास कामांसाठी भरघोस केंद्रीय निधी देण्याबरोबरच मुस्लिम ट्रस्टला सर्वतोपरी सहकार्य करु, अशी सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री ना. श्री. रामदासजी आठवले यांनी ग्वाही दिली.

भुईंज। महेंद्रआबा जाधव

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री ना. श्री. रामदासजी आठवले, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. अशोकराव गायकवाड हे सातारा दैऱ्यावर असताना भुईंज येथील दरबार हॉटेल या ठिकाणी थांबले असता मुस्लिम समाज मस्जिद ट्रस्टच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना मशिदी मागील संरक्षण भिंत अणि दफन भूमी मधील रस्ता व वाॅल कंपाउंड होणे बाबत मागणीचे निवेदन दिले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष स्वप्नील भाई गायकवाड , वाई तालुका संघटक दस्तगीर भाई मोमीन ( बाबाशेठ ),  तसेच रिपाई शिष्टमंडळ यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी भुईज मुस्लिम समाज चेअरमन अरिफ मोमीन, माजी चेअरमन कमरदिन मोमीन, दस्तगीर मोमीन, जाकिर मोमीन, समीर मोमीन,  सादीक मोमीन, समीर मणेर, अल्ताफ मोमीन,  मोईन मोमीन, तसेच त्यांचे सहकारी, सर्व मुस्लिम समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!