श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूह यांचेवतीने भव्य किर्तन व भजन महोत्सवाचे आयोजन
![]()
स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या २० व्या पुण्यस्मरणार्थ कल्याण पार्क मैदान, विलासपूर, सातारा येथे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूह यांचेवतीने दि.२ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत भव्य किर्तन व भजन महोत्सव आयोजन.
भुईंज। महेंद्रआबा जाधव :
माजी मंत्री, विकासरत्न व सहकार महर्षी स्व.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य किर्तन व भजन महोत्सव आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समुहाचे संस्थापक फिरोजभाई पठाण यांनी दिली.
भव्य किर्तन व भजन महोत्सवात शुक्रवार दि.०२/०२/२०२४ रोजी दु. ३:०० वा. महादेव भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम तसेच दु. ४:०० वा. स्वरसंध्या भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम तर सायं. ५:०० वा. ह.भ.प. नेहाताई साळेकर, पुणे यांचे किर्तन होणार आहे.
शनिवार दि. ०३/०२/२०२४ रोजी दु. ४:०० वा.पौर्णिमा भजनी मंडळाचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार असून सायं. ५:०० वा. ह.भ.प. गोविंद महाराज गोरे, आळंदी यांचे किर्तन होणार आहे.
रविवार दि. ०४/०२/२०२४ रोजी दु. ४:०० वा. वैष्णवी भजनी मंडळाचा
सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार असून सायं. ५:०० वा. ह.भ.प. प्रविण महाराज शेलार विठ्ठलधाम, क्षेत्र आंबेघर यांचे किर्तन होणार आहे.
तरी या आध्यात्मिक महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन
श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समुहाच्यावतीने करण्यात आले आहे.














