बावधन तंटामुक्ती समितीच्या वतीने कर्तुत्वांचा सन्मान
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती बावधन तालुका वाई यांच्या वतीने गावातील कर्तुत्ववान व्यक्तींचा शाल श्रीफळ पुष्पहार पेढे भरून यथोचित गौरव करण्यात आला.
बावधन तंटामुक्त समितीची मीटिंग दर रविवारी सकाळी नऊ वाजता असते त्यावेळी गावातील भागातील तंटे प्रकरणांचा सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न केला जातो त्याच बरोबर गावातील पदनियुक्त व गौरवशाली कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समितीच्या वतीने सत्कार केला जातो. जेणेकरून त्यांच्या कार्याला प्रेरणा चालना मिळावी या उदात्त हेतूने त्यांचा सत्कार केला जातो.
अशाच व्यक्तींच्या सन्मानामध्ये बावधन मधील डॉक्टर आशिष भोसले डॉक्टर शैलेश धडे डॉक्टर मांढरे व रुग्णवाहिका चालक फिरोज डांगे यांचा सत्कार करण्यात आला या डॉक्टरांच्या टीमने वकील प्रशांत गाढवे यांचे प्राण वाचवले वकील गाढवे यांना तीव्रदयविकाराचा झटका आला होता डॉक्टरांनी तातडीने उपचार करून पेशंटला पंधरा मिनिटात सातारला पोचून त्यांचे प्राण वाचवले तसेच बावधन मधील प्रगतशील शेतकरी किसन आबा पिसाळ यांनी आपल्या मालकीची सातारा रोड येथील जागा पिण्याच्या पाण्यासाठी विहीर व टाकी भरण्यासाठी मोफत दिली तसेच तलाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेले गावातील राहुल मारुती कचरे यांचा सत्कार करण्यात आला राहुल कचरे हा शेतमजुराचा मुलगा आहे तर गावातील शिक्षक दाम्पत्यांचा मुलगा शशांक गायकवाड हा ही तलाठी परीक्षेत पास झाला शशांक याचाही सत्कार करण्यात आला.
बावधन तंटामुक्त समितीचे विद्यमान अध्यक्ष सुनील तात्या कदम यांच्या कल्पनेतून भागातील मान्यवरांचा सन्मान सोहळा होऊ लागला तंटामुक्त समिती ही केवळ वादविवादापूर्ती मर्यादित न राहता समितीच्या हातून सन्मान मार्गदर्शन प्रेरणा प्रोत्साहन शिकवण मिळावी या उदात्त हेतूने बावधनची तंटामुक्त समिती कार्यरत आहे
– दिलीप कांबळे, बावधन













