Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा सामाजिक

शांतिदूत परिवार म्हणजे समाजमनातील समाजभानाचे मुर्तीमंत उदाहरणच..!

शांतिदूत परिवार म्हणजे समाजमनातील समाजभानाचे मुर्तीमंत उदाहरणच..!
Ashok Ithape
  • PublishedJanuary 28, 2024

समाजप्रती असणारी निष्ठा , समाजसेवेचे व्रत अंगीकारत समाजामध्ये आपले वेगळेपण जोपासणारे डॉ. विठ्ठल जाधव IPS (से.नि.) यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिदूत परिवार म्हणजे समाजमनातील समाजभानाचे मुर्तीमंत उदाहरणच..!

भुईंज। महेंद्रआबा जाधव :

समाजमनामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करीत शांतिदूत परिवार आपल्या कार्याचा ठसा अटकेपार नेत रक्तदानाची गरज लक्षात घेऊन रक्तदानासारखा उपक्रम हा महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविणारा व इतरांना प्रेरणादायी आहे.

पुणे LOC हॉस्पिटल याठिकाणी शांतिदूत परिवार मार्गदर्शक सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव IPS यांच्या वाढदिवसाचे, प्रजासत्ताक दिनाचे व शांतिदूत परिवार पाचवे वर्धापन दिनाचे औचित्य साधत शांतिदूत परिवार व एल.ओ.सी रुग्णालयाचे संचालक डॉ. शशांक शाह आणि डॉ. पूनम शाह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर, शांतिदूत सेवा रत्न पुरस्कार व शांतिदूत सेवा गौरव पुरस्कार 2024 सोहळा व शांतिदूत सेवापर्व स्मरणिका प्रकाशन सोहळा पार पडला.

याप्रसंगी सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक मा. डॉ.विठ्ठल जाधव IPS (से.नि.) कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तसेच प्रमुख पाहुणे श्री.अभिनय कुंभार IRS इन्कम टॅक्स कमिशनर पुणे, श्री. शरद तांदळे उद्योजक लेखक व प्रेरणादायी व्याख्याते मान्यवर उपस्थित होते. या नंतर सर्वांचे प्रेरणास्थान डॉ. विठ्ठल जाधव IPS यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी शांतिदूत सेवा रत्न पुरस्काराने श्री. किसनजी भोसले उद्योजक पुणे, श्री. मेघराज भोसले उद्योजक पुणे,श्री. सचिन रंदाळे कर्नल,श्री. जगन्नाथ लडकत अध्यक्ष समर्थ पुणे परिवार, श्री. बबनराव पोतदार साहित्यीक पुणे, श्री.शहाजी पाटील अप्पर पोलीस अधिक्षक (से.नि), श्री. सत्यजित चौधरी सामाजिक सेवा पुणे, डॉ. मिलिंद भोई सामाजिक सेवा पुणे, अन्वर कुरेशी गझलकर, श्री. म.भा.चव्हाण गझलकार, श्री. हर्ष गोंडपाटील उद्योजक पुणे, देवा तांबे सामाजिक सेवा,श्री. विजय जगताप ज्येष्ठ पत्रकार पुणे, डॉ.पूनम शाह, डॉ.साहिल शाह, डॉ. सिमरन शाह, श्री.राजू पवार. तसेच शांतिदूत सेवा गौरव 2024 पुरस्काराने सामाजिक सेवा करणारे श्री. विकास शिंदे, श्री. हर्षद पाटील, श्री.लेशपाल जवळगे, श्री. तुषार कांबळे, श्री. अप्पा घोरपडे, श्री.विक्रांत धोत्रे, श्री. वीरेंद्र कुमार गोडारा यांना गौरवण्यात आले.

रक्तदान शिबिरांमध्ये 62 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शांतिदूत परिवाराचे विशेष पाहुणे भिक्षेकरीना सोबत घेऊन डॉ.अभिजीत सोनावणे व त्यांच्या पत्नी आले होते. दिव्यांग बांधवांचा शांतीदूत परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे रक्तदानाची प्रथम सुरुवात सौ. जयश्री सुरेश सकपाळ यांनी केले व नंतर सौ. विद्या जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार व श्री विश्वनाथ जी खांदवे अध्यक्ष शांतीदूत परिवार लोहगाव यांनी रक्तदान करीत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

शांतिदूत परिवाराचे ट्रस्टी सौ प्रमिलाताई शिरसागर,श्री. क्षीरसागर,श्री. राहुल कराळे, तसेच पदाधिकारी डॉ. व्यंकटसाई चलासनी आंतरराष्ट्रीय सल्लागार, डॉ. मधुसूदन घाणेकर आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष, सौ. तृषालीताई जाधव राष्ट्रीय अध्यक्षा, श्री.विजय ठुबे राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी शांतिदूत परिवार,श्री. पी.एस साळुंके अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र,सौ. मोनिका भोजकर अध्यक्ष महाराष्ट्र महिला विभाग, श्री. सुरेश सकपाळ सचिव महाराष्ट्र, डॉ.प्रिती काळे सल्लागार, सौ. शीतल शेखे सरचिटणीस महाराष्ट्र, सौ. विजया नागटिळक अध्यक्ष पिंपरी चिंचवड, अकबर मेमन अध्यक्ष पोलीस शांतता परिवार महाराष्ट्र, श्री.तानाजी भोसले अध्यक्ष रयत शांतिदूत परिवार महाराष्ट्र, मधु चौधरी अध्यक्ष मॉडल कॉलनी,महेश पाटील उपाध्यक्ष महाराष्ट्र रयत शांतिदूत परिवार, एल ओ सी हॉस्पिटलचे सौ. गीता शाह, डॉ.सोनाली व सर्व डॉक्टर्स व स्टाफ, अक्षय ब्लड बँकचे डॉक्टर्स आणि टीम असे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!