Tue, Mar 3, 2026
अध्यात्म

स्व.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले महाराज यांच्या २० व्या पुण्यस्मरणार्थ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व किर्तन महोत्सवाचे आयोजन

स्व.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले महाराज यांच्या २० व्या पुण्यस्मरणार्थ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व किर्तन महोत्सवाचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedJanuary 28, 2024

स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या २० व्या पुण्यस्मरणार्थ अजिंक्यतारा साखर कारखाना कार्यस्थळावर २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व किर्तन महोत्सवाचे आयोजन

भुईंज। महेंद्रआबा जाधव :

सातारा तालुक्याचे भाग्यविधाते, माजी मंत्री, विकासरत्न स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या २० व्या पुण्यस्मरणार्थ अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमाने स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या २० व्या पुण्यस्मरणार्थ स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक सभागृह शाहुनगर-शेंद्रे, येथे दि. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन यशवंत  साळुंखे,व्हा. चेअरमन श्री. नामदेव सावंत,कार्यकारी संचालक श्री. जिवाजी मोहिते, सर्व संचालक मंडळ व सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली या पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प. आप्पा महाराज आसनगावकर, ह.भ.प. रामचंद्र महाराज कदम डबेवाडी हे करणार आहेत.

पारायण सोहळ्यात सोमवार दि. २९/०१/२०२४ ह.भ.प. गुरुवर्य सुप्रियाताई साठे, पुणे. (झी टॉकीज फेम) यांचे किर्तन व सायं. ५.३० वा. हळदी कुंकू समारंभ आयोजित केला आहे.
मंगळवार दि. ३०/०१/२०२४
ह.भ.प. गुरुवर्य आकुर महाराज साखरे, छ. संभाजीनगर (झी टॉकीज फेम) बुधवार दि. ३१/०१/२०२४ ह.भ.प. गुरुवर्य बाळकृष्णदादा वसंत गडकर सातारा (झी टॉकीज फेम) गुरुवार दि. ०१/०२/२०२४ ह.भ.प. गुरुवर्य सत्पुरुष बाबामहाराज गजवडीकर , भागवताचार्य, सातारा (झी टॉकीज फेम) शुक्रवार ०२/०२/२०२४
ह.भ.प. गुरुवर्य सागर महाराज बोराटे सर (झी टॉकीज फेम)
शनिवार दि. ०३/०२/२०२४
ह.भ.प. गुरुवर्य महादेव महाराज राऊत परभणी (झी टॉकीज फेम) यांचे किर्तन व सायं. ९.०० दिपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

रविवार दि. ०४/०२/२०२४ रोजी स्व. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या २० व्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी १० ते १२  ह.भ.प. संभाजी शेळके पाटील, एम.ए.बी.एड्. (मराठी) सातारा. झी टॉकीज फेम यांचे फुलाचे किर्तन होणार आहे.
संपुर्ण पारायण सोहळ्यात
हार्मोनियम : ह.भ.प. माणिक पवार सर उपळी, नामदेव मोरे अंबवडे, बाळासाहेब चव्हाण सर कुसवडे
गायक वृंद : विजय महाराज कळंबे, निलेश महाराज मापरवाडी, सुरेश माजगावकर, रवि लोहार महाराज करंडी, निलेश पवार, काशिनाथ महाराज वर्णे, तुकाराम महाराज काळोशी, उबाळे महाराज शेंद्रे, नवनाथ महाराज मापारवडी, विशाल महाराज कुसवडे, शाम सुतार सातारा, राजू सुतार पाडळी, सुनिल यादव कुसवडे, विजय शेळके शेळकेवाडी, नितिन कांबळे जकातवाडी, ह.भ.प. संतोष महाराज ढाणे, ह.भ.प. रामचंद्र कदम
किर्तन साथ: विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, आंबेघर, विश्वंभर वारकरी शिक्षण संस्था, गांजे, ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्था करंडी, भक्त पुंडलिक वारकरी शिक्षण संस्था आसनगाव
मृदंग वृंद : मदन कदम सर, विक्रम कणसे सर, योगेश सुतार भरतगांव, प्रसाद मिस्त्री आसनगांव, गंगाराम धनवडे शिवाजीनगर, प्रमोद स्वामी शेरेवाडी, राहुल बाबर जकातवाडी.
विणेकरी वृंद : ह.भ.प. गणपत पोतेकर शेंद्रे, ह.भ.प. नारायण शेळके शेळकेवाडी, ह.भ.प. चंद्रकांत मोरे सोनगांव, गणपत भाऊ गायकवाड आसनगांव, नवनाथ जाधव धनवडेवाडी
शिंगवादक : ह.भ.प. रामदास तावरे कुमठे, राजू पुजारी वळसे, भानुदास कदम दुरंदेवाडी, धनु पुजारी कळंबे
चोपदार : ह.भ.प. संतोष पवार, धनवडेवाडी, संतोष पवार आसनगाव यांची पारायण सेवा लाभणार असून सातारा जावली तालुक्यातील सर्व बंधू भगिनी व वारकरी, आबालवृद्धांनी या अध्यात्म सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!