नेताजी ननावरे यांची “बालभारती” वरील निवडीने अजिंक्यतारा शिक्षण संस्थेच्या नावलौकिकात भर ; आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गौरवोद्गार
![]()
नेताजी ननावरे सर यांची “बालभारती” वरील निवडीने अजिंक्यतारा शिक्षण संस्थेच्या नावलौकिकात नक्कीच भर पडेल;आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गौरवोद्गार
भुईंज। महेंद्रआबा जाधव
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ “बालभारती”पुणे “पाठ्यपुस्तक निर्मितीत हिंदी विषय समिती सदस्य” पदी निवड व हिंदी निबंध स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात तृतिय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल अजिंक्यतारा विद्यामंदिर शाहूनगर, शेंद्रे येथील नेताजी ननावरे सर यांचे अजिंक्यतारा शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक संचालक आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभिनंदन केले.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत वसंतराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन केलेली ही संस्था असून बालभारती या नावाने ती ओळखली जाते. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. या नामांकित संस्थेवर झालेली निवड ननावरे सर आपल्या संशोधक ज्ञानाने सार्थ ठरवतील असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. यशवंत हरी साळुंखे, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. नामदेवराव सावंत, संस्थेचे सर्व संचालक व संस्थेचे सेक्रेटरी श्री. जिवाजीराव मोहिते, विद्यामंदिराचे प्राचार्य श्री. शिवाजीराव मोरे, सर्व शिक्षक – सेवक सहकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी ननावरे सर यांचे अभिनंदन केले.













