ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये दिशाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
सातारा : वाई येथील दिशा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाई या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण, रौप्य , कांस्य पदके पटकावली.SOF अंतर्गत गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयासाठी ऑलिम्पियाड परीक्षा घेण्यात आल्या.या परीक्षेमध्ये ४७ विद्यार्थ्यानी यश मिळवले. यांपैकी गणितात २४ सुवर्णपदके ,विज्ञानात १५ सुवर्णपदके, इंग्रजी ५ सुवर्णपदके व सामान्य ज्ञानात ३ सुवर्णपदके पदक पटकावले आहे. त्याचबरोबर या परीक्षेत दुसऱ्या स्तरासाठी एकूण 31 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांची विविध स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी यासाठी शाळेमध्ये नियोजनबद्ध तासिका, प्रयोगवर्ग ,सराव परीक्षा व शंकांचे निरसन यासाठी उच्चशिक्षित राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ शिक्षकवृंदांची नियुक्ती केली आहे. काळाची गरज ओळखून केवळ दिशाचेच विद्यार्थी नव्हे तर आजूबाजूच्या सर्व माध्यमांच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलांनाही मिळावा म्हणून संध्याकाळच्या तासिकांचे उत्कृष्ट नियोजन केलेले आहे.त्यामुळे दिशाचा हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झालेला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे दिशा अकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. नितीन कदम व संचालिका प्रा.सौ. रूपाली कदम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.













