Tue, Mar 3, 2026
सातारा जिल्हा

इव्हीएमची साताऱ्यात अंत्ययात्रा

इव्हीएमची साताऱ्यात अंत्ययात्रा
Ashok Ithape
  • PublishedJanuary 23, 2024

सातारा, दि. 23 साताऱ्यातील विविध परिवर्तनवादी संस्था, पक्ष, संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी इव्हीएमची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काडून यंत्राद्वारे होत असलेल्या निवडणूक प्रक्रियेला तीव्र विरोध करण्यात आला. इव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणूका व्हायला हव्यात असा आग्रह धरण्यात आला.

निवडणूक यंत्राची अंत्ययात्रा राजवाडा येथून सकाळी ११ वाजता सुरू झाली. ‘इव्हीएम हटाव देश बचाव’ असा नारा देत व संविधानाचा जयघोष करत ही अंत्ययात्रा दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. येथे आल्यानंतर प्रतिकात्म्तक यंत्रावर पुष्पांजली अर्पण करून अंत्यसंस्कार करण्यात आले.

यामध्ये ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक पद्मश्री लक्ष्मण माने, पी. डी. साबळे, वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, सलोखा संघटनेचे मिनाज सय्यद, प्रा. संजीव बोंडे, आप पक्षाचे मारुती जाणकर, सागर भोगावकर, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे विजय मांडके, जयंत उथळे, काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब शिरसट, मनोजकुमार तपासे, डोमेक्रॕटिक रिपब्लिकन पक्षाचे ऋषी गायकवाड, नारायण जावलीकर, मच्छिंद्र जाधव, अरविंद गाडे, वैभव गवळी, रामभाऊ जाधव.ओबीसी संघटनेचे प्रमोद क्षीरसागर, विवेक म्हस्के, सुनील त्रिंबके, गणेश वाघमारे, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल भोसले आदी मान्यवर सहभागी झाले होते. दरम्यान राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी,शिवसेना आदींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला.

निवासी जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांना संयुक्तपणे निवेदन देवून आंदोलन समाप्त झाले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!