सातारा येथे परीट समाजाचा राज्यस्तरीय वधूवर मेळावा
![]()
कामाठीपुरा सातारा येथे जमणार राज्यभरातील वधू वर आणि त्यांचे पालक
भुईंज / प्रतिनिधी
सातारा जिल्हयातील परीट समाज बांधवांचे हक्काचे व्यासपीठ असणारे संत गाडगे महाराज समाज सेवा संस्था सातारा यांच्यावतीने २८ वा राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २१ जानेवारी रोजी होत असून त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शामराव सोनटक्के, उपाध्यक्ष दिलीप काटकर, सचिव गणेश रोकडे, संपर्क प्रमुख पत्रकार जयवंत पिसाळ यांनी दिली.
महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील परीट समाज बांधवांना या मेळाव्याचे निमंत्रण दिले असून संस्थेच्या स्वमालकीच्या वहुउद्देशीय सभागृहात या मेळाव्याचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान नाव नोंदणी होणार असून दुपारी १ ते २ स्नेहभोजन व २ ते ३ वाजेपर्यंत यादी वाचन होणार आहे. इच्छुिक वधूवरांचे पालकांनी रंगीत फोटो २ प्रति व आधारकार्ड झेरॉक्स सोवत आणावे.
परीट समाज बांधवांचे आरक्षण तसेच विविध समस्याबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील मार्गदर्शक यावेळी उपस्थित राहणार आहेत याचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे माजी अध्यक्ष भिकू राक्षे व जेष्ठ नेते शंकरराव हवाळे आप्पा यांनी केले आहे.













