नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उंडाळे येथील पति-पत्नीनी केली हॅट्रिक
![]()
सलग तिसऱ्यांदा पटकावली ३ सुवर्ण पदके , तर त्यांची मुले ठरली देशातील सर्वात कमी वायाची पॉवरलिफ्टर एकुण पटकावली ६ पदके
भुईंज l महेंद्रआबा जाधव :
उंडाळे ता.कराड येथील प्रमोद पाटील व स्मिता पाटील ह्यां दापत्याने व त्यांच्या मुलानी सातारला सलग तिसऱ्यांदा ४ सुवर्ण १ रौप्य १ कांस्य पदके मिळवून दिली. प्रमोद व स्मिता पाटील यानी २०२३ मध्ये विविध संघटनेच्या मार्फत घेण्यात आलेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धांमधून राष्ट्रीय स्पर्धेत ६ सुवर्ण, राज्यस्तरीय स्पर्धेत ९ सुवर्ण ,५ सिल्वर व ५ ब्रॉन्ज मेडल अशी एकूण २५ पदके पटकावली आहेत.
पाटील कुटुंबियांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संकल्प न्यूज परिवार यांचे तर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील सुवर्ण कामगिरीस मनःपूर्वक सदिच्छा.













