भारतीय सशस्त्र सैन्यदलाध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी
सातारा दि. 12 : भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना नाशिक रोड, नाशिक येथे शासनामार्फत युवक-यवुतींसाठी 1 फेब्रुवारी ते 15 एप्रिल कालावधीत मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आनंद पाथरकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.pctcnashik@gmail.com, 0253-2451032 या दूरध्वनी व 9156073306 भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.













