Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा साहित्य

वाडमय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

वाडमय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Ashok Ithape
  • PublishedJanuary 10, 2024

सातारा, दि. 10 (जिमाका) :   मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2023 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरसकारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात   31 जानेवार 2024 पर्यंत पाठविता येणार आहेत.

दि.1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालवधीतच प्रकाशित झालेली प्रथम आवृती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराट्र राज्य साहित्य  आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर  इमारत, दुसरा मजला, सयानी  मार्ग, प्रभादेवी , मुंबई 400025 यांच्या  कार्यालयात तसेच  मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे  जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्व साधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामुल्य उपलब्ध होतील.

प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात  31 जानेवारी 2024 पर्यंत  पोहचतील अशा बेताने  पाठवाव्यात. लेखक, प्रकाशक  या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक, प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव महाराट्र राज्य साहित्य  आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर  इमारत, दुसरा मजला, सयानी  मार्ग, प्रभादेवी , मुंबई 400025 येथे पाठवाव्यात.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!