भुईंज l महेंद्रआबा जाधव :
भारतातील रस्ते अपघातांचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहन चालक कारणीभूत असतात. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात वाहनचालकाच्या दृष्टीस व आरोग्यास अनन्य साधारण महत्व आहे. वाहनचालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दृष्टी दोष असेल तर वाहन चालविताना अडचणी येत असतात. परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सातारा जिल्ह्यात होणारे रस्ते अपघात कमी करण्यासाठी सन 2023-24 या वर्षात तज्ञ डॉक्टर्सकडून नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणेबाबत मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कडून निर्देश प्राप्त आहेत. जेणेकरून वाहन चालकांना योग्य असे उपचार मिळून होणारी जिवीत हानी टाळता येईल.
त्या अनुषंगाने खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी चालक व ऑटोरिक्षा चालकांची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करण्याकरीता विशेष तपासणी शिबीर
1. प्राथमिक आरोग्य केंद्र (ग्रामीण रुग्णालय) महावळेश्वर, ता. महावळेश्वर येथे दि. 10.01.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता.
2. या कार्यालयामध्ये दि. 13.01.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येत आहे.
वरीलप्रमाणे विशेष नेत्र व आरोग्य तपासणी मोहिम या कार्यालयामार्फत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात येत आहे. विशेष नेत्र व आरोग्य तपासणी शिबीरामध्ये जे टॅक्सी चालक व ऑटोरिक्षा चालकांना दृष्टीदोष निदर्शनास येईल. अशा चालकांना चष्मे उपलब्ध करुन देण्यात येतील. तरी सर्व वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की, या नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचा सर्व टॅक्सी चालक व ऑटोरिक्षा चालकांनी लाभ घ्यावा.













