Mon, Mar 2, 2026
कलाकार कट्टा प्रशासन

सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम व प्रदर्शनिय दालनांच्या आयोजनासाठी इच्छुक संस्था, कलाकार संच , समूह यांनी १६ जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम व  प्रदर्शनिय दालनांच्या आयोजनासाठी  इच्छुक संस्था, कलाकार संच , समूह यांनी १६ जानेवारी पर्यंत अर्ज करावेत
Ashok Ithape
  • PublishedJanuary 8, 2024

सातारा दि. ८ (जि.मा.का) महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यावतीने सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम व  प्रदर्शनिय दालने या कार्यक्रमांचे जिल्हास्तरावर आयोजन करण्यात येणार असून या करीता इच्छुक संस्था, कलाकार संच / समूह यांच्याकडून दिनांक १६ जानेवारीअखेर सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यन्त अर्ज मागविण्यात येत आहे.

सदर निविदा https://satara.gov.in या वेबसाईटला उपलब्ध असेल.  महासंस्कृती महोत्सवाबाबत जाहीर प्रकटन दिनांक ८ जानेवारी २०२४. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक- दिनांक १६ जानेवारी २०२४ सायं. ६.१५. कार्यक्रमाचे संक्षिप्त स्वरुपात छाननी समितीसमोर सादरीकरण- दिनांक १९ जानेवारी २०२४ दुपारी ३.०० वाजता. कार्यक्रमाचे प्रत्यक्ष आयोजन- दिनांक ३१ जानेवारी २०२४ ते दिनांक ४ फेब्रुवारी २०२४. कार्यक्रमाची वेळ व ठिकाण- सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम सायं ५ ते रात्रौ १०.सातारा मुख्यालय, वाई मुख्यालय, कराड मुख्यालय,  फलटण मुख्यालय,  दहिवडी मुख्यालय इ. ठिकाणी आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा समन्वय व संनियंत्रण समिती यांनी कळविले आहे.

सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रम-
महासंस्कृति महोत्सवाच्या अनुषंगाने खालील दर्शविलेल्या विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने आयोजनाचे नियोजन असावे.
महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे कार्यक्रम , शिवचरित्रावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम ,  लोककलेतील विविध प्रकार – पोवाडा, भारुड, गोंधळगीत इत्यादी , विविध भागातील तसेच स्थानिक दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृती यांचे कार्यक्रम,  महाराष्ट्रातील विविध महोत्सव उदा, कोकणातील नमन व दशावतार, खानदेशातील वही गायन, विदर्भातील झाडीपट्टी, खडीगंमत इत्यादी, कवितांचे कार्यक्रम / व्याख्याने , देशभक्ती गीतांचा कार्यक्रम, जिल्हयातील स्थानिक सण / उत्सव / कार्यक्रम करणे.

प्रदर्शनिय दालने-
छत्रपती शिवाजी महाराज सचित्र दालन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यांपर्यन्त पोहोचविण्यासाठी कार्यक्रम / प्रदर्शन भरविणे, वस्त्र संस्कृती दालन,  हस्तकला वस्तु दालन, बचत गटांचे उत्पादन दालन,
पर्यटन विषयक दालन
वरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. यापैकी कोणत्याही प्रकारात अर्जदार अर्ज करु शकतात.
सांस्कृतिक कार्यक्रम हा उक्त परिशिष्ठ अ मध्ये उल्लेख केलेल्या विषयासच अनुसरुन व दर्जेदार असावा.
अर्जदार/अर्जदार संस्थेने अपेक्षित मानधनाचा स्पष्ट उल्लेख करावा.
अर्जदार/अर्जदार संस्थेने कार्यक्रमात सहभागी होणा-या कलाकारांची संख्या नमूद करणे आवश्यक आहे.
अर्जदार/अर्जदार संस्थेने आपल्या चमूतील/संचातील सर्व सदस्यांची निवास, प्रवास, अल्पोपहार, भोजन तसेच इतर आवश्यक सोयी सुविधा स्वतः करावयाची आहे.
प्रदर्शनिय दालने प्रकारात सहभागी होणा-या सर्व संस्था/ समूह यांनी प्रदर्शनाबाबतच्या सर्व आवश्यक त्या परवानग्या संबंधित यंत्रणाकडून घेऊन सोबत ठेवणे आवश्यक आहे.
प्रदर्शनीय दालनामधील सर्व वस्तु व साहित्याची सुरक्षा व जबाबदारी संबंधित अर्जदार/अर्जदार संस्थेने ठेवणेची आहे. प्रदर्शनीय दालन लावण्याकरिता साहित्य ने आण करणे, प्रदर्शनात प्रदर्शित करणे व काढून नेणे इत्यादी सर्व कार्यवाही
ही अर्जदार यांनी स्वखर्चाने करावयाची आहे.
अर्जदार यांनी आपला संपूर्ण पत्ता, फोटो, आधारकार्ड प्रत, मोबाईल क्रमांक (अचूक व चालू स्थितीतील) अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे.
सदर सांस्कृतिक कार्यक्रम २.३० ते ३.०० तासांचा असल्याने त्याबाबत आवश्यक ती तयारी अर्जदार यांनी ठेवावी.
केंद्र शासन अथवा राज्य शासनाच्या यापूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी कलाकार / संस्था/ समूह यांना प्राधान्य देणेत येईल.
कोणताही अर्ज स्वीकृती अथवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी सातारा यांचे राहतील.
सदर शासकीय कार्यक्रम हा सार्वजनिक स्वरुपाचा असल्याने कार्यक्रमावेळी कोणत्याही धर्माचे अगर जाती समूह पंथाच्या तसेच विविध राजकीय पक्षाच्या भावना दुखावणार नाहीत,  याची दक्षता अर्जदार व त्यांचे चमूतील कलाकारांची राहील.
महानाट्यसाठी जिल्हा समन्वय व संनियंत्रण समिती रचना पुढीलप्रमाणे करण्यात आली असून समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, तसेच समितीचे सदस्य सचिव निवासी उपजिल्हाधिकारी सातारा, व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, जिल्हा पोलीस अधिक्षक सातारा, जिल्हा शल्य चिकित्सक सातारा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सातारा, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, कार्यकारी अभियता सार्वजनिक बांधकाम विभाग (विदयुत व बांधकामे), कार्यकारी अभियंता म. रा. वि. वि. कं. सातारा, सह आयुक्त, नगरपालिका प्रशासन, मुख्याधिकारी नगर परिषद सातारा, अभिरक्षक, छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय सातारा, जिल्हा क्रिडा अधिकारी सातारा, जिल्हा माहिती अधिकारी सातारा हे सदस्य असतील.

महानाट्यासाठी समितीची कार्ये-
जिल्हा मुख्यालयी महानाट्याचे संपूर्ण आयोजन व संनियंत्रण करणे. महानाटयाच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखणे, कार्यक्रमासाठीचे स्थळ निश्चित करणे, कार्यक्रमासाठीच्या वेळा निश्चित करणे , कार्यक्रमाच्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करणे. राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील मान्यवरांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करणे, कार्यक्रमाची विविध माध्यमातून व्यापक प्रचार व प्रसिध्दी करणे. कार्यक्रमाला रोजच्या रोज विविध प्रसार माध्यमातून प्रसिध्दी देणे. कार्यक्रमास जास्तीत जास्त प्रेक्षक येतील याचे नियोजन करणे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणा-या सर्व बाबी करणे. महानाट्यासाठी शासनाच्या अनुदानाव्यतिरिक्त लागणारा निधी प्रायोजकत्वातून तसेच जिल्हा नियोजन निधीतून करण्याबाबत कार्यवाही करणे.

 

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!