साताऱ्यात कॉर्नेल महा-60 प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न
सातारा दि.3 (जिमाका) : कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सातारा येथे दि.३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्नेल महा-६० प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमप्रसंगी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस.एस. भोला, डॉ. एम. भोसले (संचालक, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन केंद्र,) अशोक जॉन (संचालक एक्स ई डी संस्था) व रूचा रोकडे मुख्य कार्यकारी अधिकारी, संते फुड्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील जवळपास २५० ते २८० इच्छुक विद्यार्थी व नवउद्योजक उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी सलमान शेख यांनी त्यांच्या नव्याने सुरू केलेल्या स्टार्टअपची यशोगाथा वाचून नव उद्योजकांना प्रोत्साहन दिले. एक्स ई डी च्या प्रतिनिधींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने सुरू केलेल्या या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नवउद्योजकांनी आपले स्टार्टअप्स यशस्वी करावेत, तसेच जिल्हा उदयोग केंद्र, सातारा मार्फत राबविण्यांत येत असलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून सर्वाधिक तरुण-तरुणींनी लाभ घेऊन सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक भरभराटीस हातभार लावावा, असे आवाहन महाव्यवस्थापक उमेशचंद्र दंडगव्हाळ यांनी केले.













