लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील खेळाडूंनी शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदके मिळवून घडविला इतिहास .
![]()
नॅशनल बॉक्सिंग मध्ये जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाले सुवर्णपदक
लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील 2 खेळाडूंनी शासकीय शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदकेमिळवून घडविला इतिहास.
सातारा / प्रतिनिधी :
अकोला येथे झालेल्या 67 व्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ‘लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील’ यासर मुलानी व सैफअली झारी, साई बल्लाळ यांची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेश,उत्तराखंड,पंजाब,हरियाणातील खेळाडूंना पराभूत करत सैफअली झारी ११वी. सायन्स आणि यासर मुलाणी १२वी. सायन्स यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आपले नाव सुवर्णपदकावर नोंदवले आहे. या दोघांनीही सातारा जिल्हा मध्ये व एल.बी.एस. कॉलेजमध्ये इतिहास निर्माण केला आहे.
कष्टाची खूप पराकष्टा करीत शासकीय शालेय स्पर्धा 2023-24 या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. या खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ यांच्या हस्ते मानाचा फेटा, शाल, श्रीफळ बॉक्सिंग किट व बॉक्सिंग ग्लोज देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. प्रा.मेजर मोहन वीरकर, डॉ.विकास जाधव, प्रा.शिरीष ननावरे, प्रकाश महाडिक, राजेंद्र होले, व मानद प्रशिषक सागर जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे व राजेंद्र मुंदडा व सायन्स विभागातील सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन व कौतुक केले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या मा. सौ. शुभांगी गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री कौस्तुभ गावडे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर, ज्यु. विभाग प्रमुख सौ. व्ही.एस.शिंदे व प्रा.सुनील शिंदे तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनी,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्वांनी खेळाडूच्या उत्तुंग यशासाठी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.













