स्नेहसंमेलनातून नागरिकत्वाच्या गुणांची जोपासना
वाई l प्रतिनिधी : दि.२९
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी कलांबरोबरच चांगल्या नागरिकत्वाचे विविध गुण स्नेहसंमेलनातून अंगी बाणवले जातात. समंजसपणा, शहाणपण वाढते, असे मत पुणे विभाग पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी व्यक्त केले.
ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक विश्वनाथ पवार, अध्यक्ष जिजाबा पवार, उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ सचिव चंद्रकांत शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत विकास शिक्षण संस्थेचे (पुणे) संचालक डॉ. महेंद्र शिंदे यांनी प्रत्येक मूल वेगळे असते म्हणून, पालकांनी आपल्या पाल्याची तुलना इतर मुलांशी करू नये,असे आवाहन केले. संमेलनातून जीवन कौशल्यांचा विकास साधला जावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एकनाथ जगताप यांनी गुणात्मक प्रगतीबरोबरच क्रीडा कौशल्यांच्या विकासासाठी शाळा प्रयत्नशील असल्याचे सांगितले. जलतरण तलावाची निर्मिती करणार असल्याचेही ते म्हणाले.
विश्वस्त दिलीप चव्हाण, दत्ता मर्ढेकर, प्रा.दत्तात्रय वाघचवरे, बाळकृष्ण पवार, रवींद्र केंजळे, विश्वास पवार, भद्रेश भाटे,हंबीरराव पवार, आदींच्या हस्ते गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना, क्रीडापटूंना प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शालेय वार्षिक कामगिरीचे प्रथम पारितोषिक ग्रीन हाऊसला देण्यात आले. उत्कृष्ट क्रीडा शिक्षक सचिन लेंभे, वजीर शेख, अमर धापते, कलादिग्दर्शक इम्रान मुजावर यांनाही सन्मानित करण्यात आले. प्राचार्य शुभांगी पवार यांनी अहवाल वाचन केले. जाणता राजा महानाट्याचे सादरीकरण झाले.सांस्कृतिक कार्यक्रमात ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करताना डॉ.महेंद्र शिंदे हरीश पाटणे विश्वनाथ पवार,दत्ता मर्ढेकर,
शुभांगी पवार,दत्तात्रय वाघचवरे, एकनाथ जगताप,दिलीप चव्हाण,चंद्रकांत ढमाळ













