कुसगाव येथील प्राथमिक शाळेला अक्सीस इंडिया चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे ई लर्निंग प्रोजेक्ट भेट
वाई प्रतिनिधी – आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाला अन्यन साधारण महत्व असून विद्यार्थ्यांना ई लर्निंग प्रोजेक्ट मुळे अभ्यास चांगला होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल असे प्रतिपादन संदीप रांजणे यांनी केले.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या डोंगराळ भागातील विठ्ठलवाडी ( कुसगाव ) येथे प्राथमिक शाळेला अक्सीस इंडिया चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे ई लर्निंग प्रोजेक्ट भेट देण्याचा कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले की या फाउंडेशन मार्फत वाई तालुक्यातील दुर्गम व शहरी भागातील १०० हुन अधिक शाळेना मोफत ई लर्निंग प्रोजेक्ट देण्यात आला आहे.
त्या शाळेना काही दुरुस्ती नवीन अभ्यास क्रम हवा असल्यास आमच्या कडे संपर्क साधावा जेणेकरून प्रोजेक्ट चालू राहून विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करता येईल.
कर्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सरपंच प्रदीप गोळे होते यावेळी उपसरपंच देवराम निकम शालेय कमिटी अध्यक्ष सचिन निकम माजी सरपंच लक्ष्मण गोळे मुख्याध्यापक शिवाजी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पाटणे इंदूबाई गोळे मंगल पाटणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते













