Thu, Jan 15, 2026
कृषी वार्ता स्थानिक बातम्या

भुईंज येथे सेंद्रिय शेती कार्यशाळा

भुईंज येथे सेंद्रिय शेती कार्यशाळा
Ashok Ithape
  • PublishedDecember 26, 2023

मा.जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना प्रशिक्षण
शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी प्रशिक्षण देण्याकरिता कृषी विभाग व आत्मा सातारा यांचे मार्फत डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत भुईंज येथे तालुकास्तरीय सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजीत करण्यात आली आहे.

सदर कार्यशालेस जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ.भाग्यश्री फरांदे, प्रकल्प संचालक,आत्मा श्री विकास बंडगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यशाळेत शेतकऱ्यांना जैविक खते,जैविक कीटकनाशके तयार करणे तसेच सेंद्रिय पद्धतीने शेतमाल पिकवणे व त्याची विक्री व्यवस्था करणे याबाबत तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

यासाठी नारायणगाव,पुणे येथील शाश्वत शेती फाउंडेशन चे संचालक श्री सुजित पाटे, व कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील विषयतज्ञ श्री संग्राम पाटील शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

भुईंज कृषी मंडळात 500 हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण,शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत कृषी निविष्ठा तयार करण्यासाठी तसेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी,सेंद्रिय शेतमाल विक्रीव्यवस्था इ.साठी जैविक शेती मिशन अंतर्गत अनुदान उपलब्ध होणार आहे.

याबाबत माहिती देण्यासाठी गुरुवार,दि 28 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वा.भुईंज येथील साईविश्व मंगल कार्यालयात सेंद्रिय शेती कार्यशाळा आयोजीत केली असून यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन वाईचे तालुका कृषी अधिकारी श्री प्रशांत शेंडे यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!