आसले येथील भजन महोत्सवात ८० हून अधिक मंडळांचा सहभाग । रामकृष्ण हरी वारकरी संघातर्फे यशस्वी संयोजन
वाई l प्रतिनिधी : दी. २५ डिसेंबर
राम कृष्णा हरी वारकरी संघ, वाई तालुका यांच्यातर्फे वाई ता. वाई येथे नुकताच, दि. २४ रोजी एकदिवसीय भजन महोत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न आत्या जिलपातीक ८० हुन अधिक अजनी मंडळांच्या सहभागातून हा कार्यक्रम यशस्वी झाल.
आसले येथील भवानी मातेच्या मांदरात सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संपन्न झाला हा भजन महोत्सव आसले ग्रामस्थ, जय भवानी भजनी मंडळ आसले यांच्या संयुक्त विद्यमाने व राम कृष्ण हरी वारकरी संघाच्या पुढा काराने घेण्यात आला होता.
संघाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अरुण कट्टे यांनी हिंदू धर्म टिकवणे आणि वृध्दींगत करण्यासाठी गावोगावी सांप्रदायिक भजनी मंडळांची आवश्यकता असल्याचे त्यांच्या भाषणात सांगितले
संघाचे जिल्हा सचिव हेमंत हास्पे यांनी गाव तिथे भजनी मंडळ व राम कृष्ण हरी वारकरी संघाची शाखा स्थापन करण्याबाबत ठिकठिकाणच्या सांप्रदाय प्रेमीनी सक्रिय राहावे, असे आवाहन केले.
सध्याच्या धकाधकीच्या व गतीमान युगात युवक वर्ग व अबाल – वृद्ध मोबाईलच्या मोहजालातून बाहेर काढण्यासाठी भजनी मंडळ व वारकरी सांप्रदायाची गोडी लावणे महत्वाचे आहे, असे वारकरी संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख अशोक पोळ यांनी सांगितले.
या भजन महोत्सवासाठी रामकृष्ण हरी वारकरी संघाचे प्रमुख ह.भ.प. हणमंतराव वाघ, यांनी प्रस्ताविक, तर वाई तालुकाध्यक्ष अभय क्षीरसागर, दक्षिण विभागाचे संपर्कप्रमुख भरत दत्तोबा कदम यांनी सूत्रसंचालन केले. देगाचे पोलिस पाटील ह. भ. प. राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.
या संपूर्ण महोत्सवास जिल्हाअध्यक्ष अरुण काटे,
उपजिल्हाध्यक्ष शंकरराव गोळे, मान तालुकाध्यक्ष ह.भ.प. ओंबासे महाराज, गोंदवलेचे आदर्श शिक्षक दादा महाराज कट्टे, मोहनराव ढवळ, महाबळेश्वरचे तालुका अध्यक्ष नामदेवशेठ भोसले, वाई तालुका उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढगे, वाई तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा ज्योतीताई वाघ, गुलाबराव अंब्राळे, सौ.अश्विनी क्षीरसागर, शिवराम पवार, भिकूबुवा भोसले आदींसह संपूर्ण जिल्हयातून रामकृष्ण हरी वारकरी संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होतो.
या भजन महोत्सवात वाई, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, माण, सातारा, जावली आदी तालूक्यातील ७० हुन अधिक भजनी मंडळांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघाने भजन, अभंग, गौळण सादर करून भक्तीमय वातावरण निर्माण केले होते.
गोंधळेवाडी-आसलेच्या जय भवानी भजनी मंडळाने गायलेल्य भैरवी गायन आणि महाआरतीने या भजन महोत्सवाची सांगता झाली.













