Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा स्थानिक बातम्या

सातारा शहरातील मुख्य बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडीसाठी उपाय लागू; मात्र सुविधांचे काय ?

सातारा शहरातील मुख्य बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडीसाठी उपाय लागू; मात्र सुविधांचे काय ?
Ashok Ithape
  • PublishedDecember 25, 2023

सातारा / प्रतिनिधी :

सातारा शहरातील मुख्य बस स्थानक परिसरात सातत्याने होणा-या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सातारा पोलिस दलाने ठोस पावले उचचली आहेत. पोवई नाका तहसिल कार्यालय मार्गे बस स्थानकात जाणाऱ्या वाहनांना उजव्या बाजूस वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. दि. 25 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पोलिस दलाने म्हटले आहे.

एस.पी. समीर शेख यांच्या आदेशान्वये सातारा शहरातील पोवई नाका येथून जाणाऱ्या एसटी बससह अन्य वाहनांना बस स्थानकात (इन व आउट गेटसमोरून) जाता किंवा बाहेर येता येणार नाही. पोवई नाका किंवा गणपतराव तपासे मार्ग (न्यू राधिका रोड) येथून येणाऱ्या कोणत्याही वाहनांना (इन व आउट गेटसमोरून) उजवीकडे वळसा मारता येणार नाही. बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या सर्व बसला देखील उजवीकडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

नव्या नियमानूसार पोवई नाका येथून येणाऱ्या बस व अन्य वाहनांनी भूविकास बँक चौकातून वळसा मारुन बस स्थानकाकडे यावे. तसेच बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या बस या पोवई नाका येथून जूनी डीसीडी बँके मार्गे पारंगे चौक, जुने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चौकातून राष्ट्रीय महामार्गाकडे जातील.

नो पार्किंग झोन

सातारा मुख्य बस स्थानक नजकीच्या मार्केट यार्ड येथील माजी राज्यपाल गणपतराव तपासे मार्ग आणि मनाली कॉर्नरला जोडणारा रस्ता हा नो पार्किंग झोन (no parking zone) जाहीर करण्यात आला आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूस वाहने लावली जातात. रस्ता रुंदीने लहान असल्याने वाहतूकी कोंडी होत असल्याची वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन हा रस्ता नो पार्किंग झोन जाहीर केला गेला आहे.

बस स्थानकामधून बाहेर जाण्यासाठी आऊट गेट हजेरी माळ्याच्या बाजूला काढावे. तो मधला रस्ता नो पार्किंग करावा. म्हणजे बसेसना मोठा वळसा घ्यावा लागणार नाही. त्यापेक्षा एस टी डेपो पाठीमागून outgoing करा इंधन वाचेल.

वेळ वाचेल व ट्रॅफिकमधून सुटका होईल. बाहेर पडणाऱ्या बसेस पोवई नाक्यावर येऊन तेथून डीसीसी बँक मार्गे खाली जाणार असे दिसत आहे, तथापि तहसीलदार ऑफिससमोरून जो रस्ता जुन्या डीसीसी बँकेकडे गेला आहे, तो खूपच अरुंद आहे. पादचारी लोकांचा त्यात अजिबात विचार केलेला नाही. ह्या मार्गावर जर एसटी बसेसची वर्दळ वाढली तर विनाकारण पादचारी जीवाला मुकु शकतात आणि नेहमीप्रमाणे केस मात्र एसटी ड्रायव्हरवरतीच होणार.

एसटी बस स्थानकामधून बाहेर जाण्यासाठी आऊट गेट हजेरी माळ्याच्या बाजूला काढावे. तो मधला रस्ता “नो पार्किंग” करावा. म्हणजे बसेसना मोठा वळसा घ्यावा लागणार नाही.

सध्य परिस्थिती मध्ये भूविकास बँक चौक ते महेंद्र चव्हाण यांचे घर यामधील रस्ता अत्यंत दयनीय परिस्थितीत आहे. त्यात जर का वाहतूक वाढली तर फार अवघड परिस्थिती होणार आहे… लोकांना विविध प्रकारचे त्रास या रस्त्यामुळे होत आहेत. वाढे फाट्याकडून येणाऱ्या गाड्या फारच वेगात येतात व महेंद्र चव्हाण यांचे घराच्या चौकातून पुढे जातात. निर्मला कॉन्व्हेंट शाळेतली मुले सुद्धा या रस्त्याने   जातात…. या रस्त्यावर अपघात व्हायची शक्यता आहे.

पोवई नाका ते भुविकास बँक पर्यंत नो पार्किंग आणि नो होकर्स झोन करावा त्यामुळे बरीच वाहतूक कोंडी होणार नाही. जास्त त्रास होणार भूविकास बँक चौकातून अपघात होण्याची जास्त शक्यता नाकारता येत नाही. तिथे अगोदर वाहने वेगाने येत असतात बस स्टँडचे आउट गेट च मागच्या बाजूला घेतलं तर सगळ्या समस्या दूर होतील जिथे मोकळा रस्ता आहे वाहतूक ही नाही.आता नवीन ST स्टँड गावाबाहेर म्हणजे हमदाबाद फाटा ( कोंडवे) , लिंबखिंड, वाडे फाटा , माहुली, कणसे ढाबा ( खिंडवाडी ) येथे होणे गरजेचे आहे.

आउट इन गेटवरील लगत असलेल्या रिक्षा स्टॉप व इतर वाहतुकीचा अडचण होणारे गाडे काढले तरी बऱ्यापैकी ट्रॅफिक सुरळीत होईल. गेट पासून किमान दहा मीटर अंतरावर कोणतीही वाहन थांबवले नाही तरी सुरळीत होईल. याशिवाय सातारा शहरात ठीक ठिकाणी पार्किंग सुविधा देणे गरजेचे आहे. शाळांच्या परिसरामध्ये वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मुळातच नियम करण्याची घाई करण्यापूर्वी सुविधा देण्याच्या दृष्टीने नगरपालिका, वाहतूक शाखा व पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा दररोज बदलणारे नियम करून नागरिकांना व वाहनचालकांना वेठीस धरण्यात काहीच अर्थ नाही.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!