डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने भुईंज पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी स्वच्छता अभियान
भुईंज / प्रतिनिधी :
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठं योगदान असून विविध समाजोपयोगी उपक्रमांन बरोबरच वृक्ष लागवड, आरोग्य व स्वच्छता अभियानात प्रतिष्ठानने अतुलनीय कामगिरी केली आहे. समाजसेवेचा वारसा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे जात असून ही गौरवास्पद बाब असल्याचे प्रतिपादन वाई पोलीस स्टेशनचे डी. वाय. एस. पी. बाळासाहेब भालचीम यांनी यावेळी केले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने भुईंज पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र भुईंज येथे आयोजित स्वच्छता अभियान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमास भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनी रमेश गर्जे, रत्नदीप भंडारे , सर्व पोलीस कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते, गोपाल शिंदे, राजेंद्र पांढरपट्टे, श्री शिंदे, श्रीमती कुमठेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित असणारे आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक सर्व कर्मचारी व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे म्हणाले – डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य जगप्रसिद्ध आहे. आजच्या या मोहिमेअंतर्गत प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी सकाळपासूनच शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे. या स्वच्छतेच्या कार्यात प्रत्येक कामाने केलेली मदत ही आम्हाला पुढे चालना देणारी आहे. अशा कार्यास आमच्या प्रशासनाची वेळोवेळी लागणारी मदत केली जाईल.
यावेळी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पोलीस स्टेशनचा संपूर्ण परिसर व प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर त्या ठिकाणी रस्त्यावरील कचऱ्याचे ढीग, पालापाचोळा, या प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सदस्यांनी निस्वार्थीपणे हातात खराटा, फावडे, घमेले, ट्रॅक्टर च्या मदतीने परिसरात वाढलेले गवत, झुडपे, कचरा, पालापाचोळा, काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या उचलून स्वच्छता करण्यात आली.
सकाळी सात वाजल्यापासून स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली साधारणपणे या परिसरात साडेपाच टन कचरा गोळा करण्यात आला. दोन ते तीन तासातच सर्व श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविली. या मोहिमेचे भुईंज परिसरातून कौतुक केले जात आहे.













