Tue, Mar 3, 2026
सहकार स्थानिक बातम्या

उत्कर्ष श्री २०२३ चा मानकरी ग्यानसिंग निषाद ठरला तर उत्कर्ष मेन्स फिजिक्स चा बहुमान अजिंक्य महामुनी याने पटकावला.

उत्कर्ष श्री २०२३ चा मानकरी ग्यानसिंग निषाद ठरला  तर उत्कर्ष मेन्स फिजिक्स चा बहुमान अजिंक्य महामुनी याने पटकावला.
Ashok Ithape
  • PublishedDecember 22, 2023

उत्कर्ष पतसंस्था व वाई जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने वाईच्या महागणपती घाटावर “वाई फेस्टिवल “ चे आयोजन केले जाते. कै आनंद कोल्हापुरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या “ उत्कर्ष श्री ” शरीर सौष्ठव स्पर्धेचे हे २३ वे वर्ष असून तरुणांमध्ये व्यायामाची ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने सुरु केलेली हि स्पर्धा अखंडित सुरु आहे. हे वाई फेस्टिवल अंतर्गत दि.२१/१२/२०२३ रोजी जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न झाली.

यामध्ये १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .६ वजनी गटात झालेल्या स्पर्धेमध्ये मानाचा उत्कर्ष श्री हा किताब सातारचा ग्यानसिंग निषाद याने पटकावला तर मेन्स फिजिक्स हा किताब वाईचा अजिंक्य महामुनी याने पटकाविला.

गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे मेडल्स व सर्टिफिकिट देण्यात आले.उत्कर्ष श्री हि स्पर्धा सातारा जिल्ह्यातील नामांकित स्पर्धा असून ,अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी काही महिने आधीच तयारी करीत असतात.स्पर्धेला एक नवी उंची दिल्याबद्दल राष्ट्रीय पंच राजेंद्र हेंद्रे यांनी अमर कोल्हापुरे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या .स्पर्धेसाठी पंच म्हणून मुरली वत्स ,नितीन माने,मिथिल भंडारी,अमित कासट,अजित सांडगे,चंदू पवार ,अनिल फुले,यांनी काम पहिले.तर स्टेजमार्शल म्हणून धनंजय चौगुले यांनी काम पाहिले.

स्पर्धेसाठी उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा. श्रीमती.अनुराधा कोल्हापुरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. रमेश यादव ,मदनकुमार साळवेकर मंगला अहिवळे, अलका घाडगे,शरद चव्हाण,सलीमभाई बागवान ,संजय वाईकर,सागर मुळे,वैभव फुले ,भूषण तारू ,प्रकाश पवार ,अमीर बागुल ,नितीन वाघचौडे ,प्रशांत मांढरे ,प्रणव गुजर,तसेच कार्यक्रमाचे प्रायोजक ओमकार डेव्हलपर्स चे मालक सुनील संकपाळ ,विकास शिंदे,जयवंत पवार ,अजित कायंगुडे,प्रसाद महाडिक ,संतोष पवार ,स्वप्नील भिलारे ,गणेश पाडळे,योगेश फाळके,निखील जाधव ,हिंदुराव पिसाळ ,संतोष जाधव ,वैभव भोसले,अनिल शिंदे,उमेश गायकवाड ,सागर वाघ ,आप्पा मालुसरे,विजय चौधरी,धनंजय महांगडे,तेजस जमदाडे ,आल्पेश कांबळे,उमेश खरोटे ,संदीप कोरडे ,संतोष शिंदे ,स्वप्नील गायकवाड ,सचिन मानकुंबरे,प्रणव थोरवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!