Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता

राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी 28 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत

राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी 28 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत
Ashok Ithape
  • PublishedDecember 21, 2023

सातारा दि.21 : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, सातारा मार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2023-24 करीता मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबहेरील अभ्यास दौऱ्याचे जानेवारी 2024मध्ये आयोजन करण्यात आले आहे. तरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील व महिला लाभार्थी यांनी 28 डिसेंबरपर्यंत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत.

यामध्ये परराज्यातील कृषि विद्यापीठे, राष्ट्रीय कृषि संशोधन संस्था, फलोत्पादन क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या खासगी कंपन्या/संस्था, कृषि विभागाची विविध प्रक्षेत्रे, कृषि विज्ञान केंद्रे, हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर व भारतीय कृषि संशोधन संस्था अंतर्गत संशोधन संस्था सारख्या संस्थांमध्ये जाऊन नव नवीन शोध, प्रगत तंत्रज्ञान, विविध पिक पद्धती, आधुनिक शेतीबाबतची माहिती घेता येणार आहे, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी कळविले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!