![]()
रेकाॅर्ड ब्रेक रक्तदानातून वाईकरांनी दाखवली आपली खरी ओळख
वाईची उत्कर्ष पतसंस्था हीच सहकारी क्षेत्रातील सहकारज्जेता
वाई प्रतिनिधी :
सहकार काय असतो, कसा असतो, कसा जिवंत ठेवला जातो आणि तो काय काय करू शकतो हे उघड्या डोळ्यांनी पहायचे असेल तर तीर्थक्षेत्र वाईला आवर्जून यावे, पहावे आणि शिकून घ्यावे इतकं बरच काही…कारण संस्थेची भरभराट करणारी माणसं, पाठिंबा देणारी माणसं आणि राबणारी माणसं भविष्याच सुंदर स्वप्नं घेऊन समाजासाठी, सहकार क्षेत्रासाठी आणि उद्याच्या नव्या भारत देशासाठी अहोरात्र कष्ट घेतायत म्हणूनच उत्कर्ष पतसंस्था अग्रगण्य संस्था संपूर्ण महाराष्ट्रात परिचीत आहे.
त्यातच वाई फेस्टिवलचा वाजत असलेला डंका हा सर्वांसाठी नवपर्वणीच ठरत आहे आणि
त्याच दूरदृष्टी भावनेतून वाई जिमखाना आणि उत्कर्ष पतसंस्था वाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वाई फेस्टिवल उपक्रमात वाईतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळाले, महाराष्ट्रभर या उपक्रमाचा डंका जेव्हा पिटला जातो तेव्हा तालुका, जिल्हा आणि राज्यभरातून येणारे कलाकार या वाईच्या तीर्थक्षेआत जेव्हा समरस होऊन जातात तेव्हा सांस्कृतिक वाईचा सर्वांगीण आविष्कार, नेटके नियोजन आणि प्रत्येक वेळी नव्या रंगात, नव्या ढंगात पहायला उत्सुकतेची जणूकाही रेलचेलच…
सामाजिक बांधिलकीतून लहानपणापासून मोठ्यांपर्यंत कलेची कल्पकता आणि कल्पकतेतून वास्तवातील संस्कृतीच जेव्हा दर्शन होते तेव्हा वाईच्या तीर्थक्षेत्राला खऱ्या अर्थाने वाई फेस्टिवलच्या माध्यमातून जो दागिना चढवला जातो तो नक्कीच सोन्याहून पिवळा..
आणि त्याच उपक्रमातून राबविण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला महागणपती घाटावर हजारो बालचमूंनी दाखवलेली उपस्थिती लक्षणीय होतीच त्याहीपुढे सामाजिक भान आणि बांधिलकीतून वाई बरोबर सातारा जिल्ह्यातील इतर शाखेमध्ये राबविण्यात आलेले रक्तदान शिबिर अगदी रेकाॅर्ड मोडणारेच…
रक्तदान सप्ताह पाचगणी ५०, कराड ५३, सातारा ५५, शिरवळ ६८, पाचवड १११, वाई ३०२, रक्तदात्यांनी रक्तदान केले.
एकूण ६३९
सहकारातून समृद्धीकडे आणि समृद्धीकडून लोकोपयोगी उत्कर्षाकडे हे गणित जेव्हा जुळले जाते, जुळविले जाते तेंव्हाच सहकाराचा उद्देश सफल होत असतो आणि तेच दूरदृष्टी काम डोळ्यासमोर ठेवून वाईची उत्कर्ष पतसंस्था नव्या युगात आपली दमदार पाऊले तितक्याच ताकदीने पुढे टाकत आहे.
सभासद, कर्जदार, ठेवीदारांसाठी डिजिटल युगात दर्जेदार लोकोपयोगी सेवा देऊन आपला आलेख चढता ठेवाणाऱ्या उत्कर्ष पतसंस्थेने खरोखरच संस्थेचे हित जोपासत उत्कर्ष परिवाचा खरा उत्कर्ष केला.
संस्थापक स्वर्गीय आनंदराव कोल्हापुरे (आण्णा) यांनी ज्या निर्मळ मनातून, स्वच्छ भावनेतून आणि दूरदृष्टी विचार पुढे ठेऊन सन २००८ साली वाई फेस्टिवलची मुहूर्तमेढ उभी केली तिचा आज वटवृक्ष बहरत आहे, वाढत आहे पण काळाच्या ओघात २०१६ साली आण्णांचे अकाली निधन झाले पण त्यांच्या पश्चात सुविद्य पत्नी विद्यमान चेअरमन श्रीमती अनुराधाताई कोल्हापुरे, संचालक श्री अमर कोल्हापुरे, अॅड श्री रमेश यादव, श्री सुनिल शिंदे यांनी तितक्याच ताकदीने, वेगाने आपली पाऊले टाकत या वटवृक्षाला खतपाणी टाकत तो बहरण्यासाठी आजही तितकेच कष्ट घेत त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या सहवासात आणि महागणपतीच्या आशीर्वादाने वाई फेस्टिवल ही नवपर्वणीच आणि या पर्वणीसाठी दूरदृष्टी नियोजन, संयोजन आणि प्रत्यक्ष काम करणारे हात नामानिराळेच.
म्हणूनच
“देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे”
वाई फेस्टिवल सन्माननीय पदाधिकारी – डॉ मंगला अहिवळे(अध्यक्ष), अॅड श्री रमेश यादव (कोषाध्यक्ष), श्री सुनील शिंदे (सचिव), श्री अमर कोल्हापूरे (निमंत्रक)
समिती सदस्य-
श्रीमती अनुराधाताई कोल्हापुरे, श्री मदन साळवेकर, श्री श्रीकांत शिंदे, शरद चव्हाण, श्री सलीमबाई बागवान, श्री संजय वाईकर, श्री सागर मुळे, श्री वैभव फुले, श्री भूषण तारू, श्री शैलेंद्र गोखले, श्री अमीर बागुल, श्री नितीन वाघचौडे, श्री तुकाराम जेधे, सौ प्रीती कोल्हापुरे.
मुख्य व्यवस्थापक– श्री प्रकाश पवार.
ब्रॅन्च मॅनेजर
मुख्य शाखा वाई- श्री आनंद पवार, यशवंतनगर शाखा- श्री अक्षय मराठे, पाचवड शाखा- श्री साजिद मुल्ला, पाचगणी शाखा- श्री मितेश मोरे, साताऱा शाखा- श्री प्रशांत सोनावणे, कराड शाखा- श्री हरिदास पवार, शिरवळ शाखा- श्री उदय घाडगे, रंगता बेडेकर, प्रसाद भिसे, हेमंत करंंजे,निरंजन गोळे आणि सर्व अधिकारी कर्मचारीवृंद आणि राबणारे आणि प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व हात…
तुम्हा सर्वांच्या दूरदृष्टी विचारांसाठी, राबणारांसाठी आणि सामाजिक बांधिलकीसाठी हा तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी शब्दप्रपंच…
वाई प्रतिनिधी : दिपक पवार













