ज्ञानांजन संगीत प्रतिष्ठान महाराष्ट्र व वाई तालुका वारकरी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य संगीत शिक्षण कार्यक्रम संपन्न
वाई : प्रतिनिधी :
वाई येथील लोकमान्य टिळक ग्रंथालय मध्ये ज्ञानांजन संगीत प्रतिष्ठान महाराष्ट्र व वाई तालुका वारकरी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य संगीत शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या शिबिरात वाई तालुका व शहर आणी जिल्ह्यातील ९० हुन अधिक प्रशिक्षणार्थी नी सहभाग घेतला होता.
या शिबिरात मार्गदर्शन करताना ह भ प कैवल्य (आझाद )महाराज गुजर यांनी गायनातील संपूर्ण स्वर मालिकेची ओळख त्यातील मुख्य स्वर सा रे ग म प ध नि सां या सात याची नावे ष ड ज ऋषभ गंधार मध्यम पंचम धैवन निषाद षड्ज नावे त्याच्या व्याख्या आरोह अवरोह व त्यातील शुध्द स्वर मध्ये ७ कोमल ४ त्रिव १ एकूण १२ मालिकेची व स्वरांचा स्वभाव त्याचा नित्येनियमाने खुला सोडणे दाबणे ओढणे करावयाचा११ मिनिटांचा सराव याची माहिती दिली व सातारा येथे दरवर्षी संगीत महोत्सव व ज्ञानेश्वर महाराज यांच्या ओवी मंदिराचा, संकल्प व्यक्त केला, ५० विध्यार्थी उपस्थित राहणार असतील तर दर रविवारी वाई शहरात विनामूल्य संगीत प्रशिक्षण शिकवणार अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती मातेचे पूजन मा नगराध्यक्ष अनिल सावंत, मा उपसभापती विक्रांत डोंगरे, वाई तालुका वारकरी महासंघाचे अध्यक्ष ह भ प मारुती महाराज चोरट, करणसिह मोहिते, हिंदुराव गोळे, जगन्नाथ शिंदे रामदास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
समारोपाच्या कार्यक्रमात राजेंद्र शेलार यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले ह भ प प्रशांत महागडे, चैतन्य पाडळे, विशाल गुजर, समीर बुचडे, गणेश गुजर, संदीप गाढवे, विक्रम फणसे, मारुती शिंदे, लक्ष्मण ढवळे सरस्वती वाशिवले डॉ पोतदार दत्तात्रय कुलकर्णी यांनी शिबीर संपन्न होण्यास विशेष परिश्रम घेतले.













