वाई येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेचे राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेत यश
वाई / प्रतिनिधी :
वाई येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्याशाळेमधील सतरा विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे.
या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींच्या बँक खात्यावर पहिला शिष्यवृत्ती चा हप्ता रू 9600 जमा झाला.
सारथी या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या एनएमएमएस परीक्षेतील यशस्वी विद्यार्थीनींना सलग चार वर्षे म्हणजे 12 वी पर्यंत ही शिष्यवृत्ती चालू राहणार आहे.
या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थिनींचे मुख्याध्यापिका रुक्मिणी भोये, सुचिता पवार यांनी अभिनंदन केले.
तसेच मार्गदर्शक शिक्षक दीपक पिंपळे,अंजुषा हिंगसे यांचा सत्कार केला.
शाळेमधील विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल प्रभाकर सोनपाटकी, सर्व शाळा समिती सदस्य यांनी आनंद व्यक्त केला.
यशस्वी विद्यार्थिनींची नावे
१. भोसले कादंबरी दत्तात्रय
२. भोसले पायल सचिन
३. जाधव ऋतुजा शिरीष
४. पिसाळ गिरीजा ताराचंद्र
५. पिसाळ संस्कृती धनंजय पिसाळ साक्षी मुकुंद
६. पिसाळ श्रावणी किरण
७. तरडे अनघा रामदास
८. यादव प्रेरणा सुशांत
९. पोळ मनस्वी आनंदा
१०. साबळे चेतना संतोष
११. कायंगुडे श्रावणी महेंद्र
१२. मांढरे समृद्धी मारुती
१३. भांडवलकर वैष्णवी छबुराव
१४. पिसाळ विष्णूप्रिया प्रतापसिंह
१५. गोरे श्रावणी श्रीकांत
१६. पिसाळ श्रेया रणधीर













