Mon, Mar 2, 2026
क्राईम न्यूज सातारा जिल्हा

डॉक्टरांच्या हाय प्रोफाईल पार्टीवर पोलिसांचा छापा

डॉक्टरांच्या हाय प्रोफाईल पार्टीवर पोलिसांचा छापा
Ashok Ithape
  • PublishedDecember 13, 2023

वाई l प्रतिनिधी :

कासवंड ( भिलार ता महाबळेश्वर ) येथील हॉटेलमध्ये मध्यरात्री हाय प्रोफाईल पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून सातारा सांगली व पुण्यातील आठ डॉक्टर व हॉटेल चालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

भिलार (ता महाबळेश्वर) पासून जवळच असणाऱ्या कासवंड येथील एका निसर्गरम्य ठिकाणावर स्प्रिंग रिसोर्ट या हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून चार नर्तिकांसह आठ जणांना ताब्यात घेतल्याने साताऱ्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी महाराष्ट्र हॉटेल उपहारगृहे व अश्लील नृत्यांवर प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कासवंड गावातील स्प्रिंग रिसॉर्ट मध्ये डॉक्टर लोकांसमोर युवतीं तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नाच करीत नृत्यासह पार्टी चालू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आचल दलाल यांना मिळाली. त्यावरून साताऱ्यातील विशेष पथक व पाचगणी पोलीस कासवंड येथे रवाना करण्यात आले.

रिसॉर्टच्या तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील पाच व मिरज येथील एक व पुण्यातील औषध विक्रेता असे सात जण दारूच्या नशेत नर्तिकांवर नोटा उडवत असतानाच रंगेहात पोलिसांना सापडले. पाचगणी व सातारा पोलिसांनी कारवाई करत चार महिला त्यांच्यासमवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट, हॉटेल चालक असे एकूण आठ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे पुढीलप्रमाणे डॉ मनोज विलास सावंत (रा दहिवडी),डॉ राहुल बबनराव वाघमोडे (रा दहिवडी),डॉ निलेश नारायण सन्मुख (रा मिरज),डॉ रणजीत तात्यासो काळे (रा दहिवडी) डॉ महेश बाजीराव साळुंखे (मलकापूर कराड) डॉ हनुमंत मधुकर खाडे (दहिवडी,सातारा) डॉ प्रवीण शांताराम सौद (पुणे फार्मासिस्ट),विशाल सुरेश शिर्के हॉटेल चालक (रा पसरणी ता वाई) चार नर्तिकांना चौकशी करून सोडून देण्यात आले.

अधिक तपास पांचगणीचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने करीत आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!